Crop Loans for Farmers : शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम तोंडावर असताना पीक कर्जासाठी बँकेत चकरा मारणाऱ्या हजारो शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. अनेक दिवसांपासून एका तांत्रिक अडचणीमुळे ज्या शेतकऱ्यांची कर्जे रखडली होती आणि ज्यांचा बँकांशी संघर्ष सुरू होता, त्यांच्यासाठी जिल्हा बँकेने अखेर एक अत्यंत महत्त्वाचा ‘यू-टर्न’ घेतला आहे. या एका निर्णयामुळे आता अशा शेतकऱ्यांनाही कर्ज मिळणार आहे, ज्यांना आजवर बँका नकार देत होत्या. नक्की कोणता आहे हा निर्णय आणि कोणत्या शेतकऱ्यांचे नशीब उजळणार आहे? जाणून घेण्यासाठी ही बातमी शेवटपर्यंत वाचा..
शेतीसाठी भांडवल उभं करताना शेतकऱ्यांची मोठी ओढाताण होते. त्यातच जर तांत्रिक कारणामुळे बँकेने कर्ज नाकारलं, तर शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहतं. असाच काहीसा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सामायिक जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत घडत होता. मात्र, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आता यावर तोडगा काढत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
येथे वाचा – मे महिन्याचा संपूर्ण हवामान अंदाज, मॉन्सून या दिवशी येणार?
नेमकी अडचण काय होती?
ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर एकापेक्षा जास्त नावे आहेत (सामायिक क्षेत्र), अशा शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यास बँकेने काही तांत्रिक कारणास्तव स्थगिती दिली होती. कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावामुळे किंवा त्यांच्या सहमतीअभावी कर्ज प्रक्रिया अडकून पडली होती. यामुळे ऐन पेरणीच्या वेळी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता.
येथे वाचा – बियाणे अर्ज सुरू; ही आहे शेवटची तारीख
बँकेचा मोठा निर्णय
शेतकरी संघटनांचा वाढता दबाव आणि शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन बँकेने आता सामायिक क्षेत्रावरील कर्ज वाटपाचा मार्ग मोकळा केला आहे. आता सामायिक खातेदार असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्यासाठी इतर खातेदारांचे केवळ एक साधे ‘संमतीपत्र’ (Affidavit/Consent Letter) बँकेत सादर करावे लागणार आहे. हे संमतीपत्र दिल्यानंतर कोणत्याही अडथळ्याशिवाय संबंधित शेतकऱ्याला पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.
२०४ कोटींची व्याजमाफी आणि विक्रमी कर्जवाटप
बँकेने केवळ सामायिक क्षेत्राचाच प्रश्न सोडवला नाही, तर जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना (Vikas Sanstha) उभारी देण्यासाठी तब्बल २०४ कोटी रुपयांचे व्याज माफ करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. याशिवाय, चालू हंगामात आतापर्यंत १०९५ कोटी ४२ लाख रुपयांचे पीक कर्ज वितरित करून बँकेने शेतकऱ्यांना मोठा आधार दिला आहे.
शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
बँकेच्या या निर्णयामुळे आता सामायिक जमीन असलेल्या हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जाची रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल. यामुळे सावकारी पाशातून शेतकऱ्यांची मुक्तता होणार असून, खरिपाच्या कामांना आता अधिक वेग येणार आहे.