top 10 budget projects in pcmc : नमस्कार मित्रांनो! सध्या म्हाडाच्या पुणे मंडळाची ४,४६२ घरांसाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू असून, या लॉटरीला आता २२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्वांनाच स्वतःच्या हक्काचं घर हवं असतं, पण अनेकदा बजेटमुळे आपल्याला मागे हटावं लागतं.
जर तुमचं बजेट १८ लाखांपेक्षा कमी असेल आणि तुम्हाला पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) हद्दीत घर घ्यायचे असेल, तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे! आम्ही आज तुमच्यासाठी PCMC हद्दीतील ‘टॉप १०’ असे प्रकल्प शोधून काढले आहेत, जिथे घरांची किंमत सर्वात कमी (११.५० लाखांपासून सुरू) आहे.
या प्रत्येक प्रकल्पाचा स्कीम कोड काय आहे? तिथे कोणकोणत्या प्रवर्गासाठी (Categories) घरे उपलब्ध आहेत? बिल्डप आणि कार्पेट एरिया किती आहे? अनामत रक्कम (EMD) किती भरावी लागेल? आणि घर रेडी पझेशन आहे की अंडर कन्स्ट्रक्शन? या सर्व प्रकल्पांची अगदी ‘ए टू झेड’ (A to Z) सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर लगेच क्लिक करा!