Drought Relief Payment Date Maharashtra : नमस्कार शेतकरी बांधवांनो! तुम्ही जर दुष्काळ मदतीच्या प्रतीक्षेत असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. दुष्काळ निवारण उपाययोजनांसंदर्भात नुकतीच मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली असून, यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देणारे अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
या बैठकीत दुष्काळ निवारणासाठी प्रामुख्याने खालील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत:
पाणी कपात: राज्यातील वाढती पाणीटंचाई लक्षात घेता, शहरी आणि ग्रामीण भागामध्ये १०% पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बँकांवर धडक कारवाई: दुष्काळाच्या स्थितीत कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या मागे तगादा लावणाऱ्या आणि त्रास देणाऱ्या बँकांवर धडक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश सरकारने दिले आहेत.

शेतकऱ्यांचा सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे दुष्काळाची मदत बँक खात्यात नेमकी कधी जमा होणार? यावर बैठकीत अंतिम निर्णय झाला असून, पैसे जमा होण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे.