दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार दुष्काळ मदत!

मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ठरल्यानुसार, राज्यात दुष्काळ जाहीर झालेल्या पात्र तालुक्यांमधील शेतकऱ्यांना शासनाने मोठा दिलासा दिला आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत, अशा सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दिवाळीपूर्वीच दुष्काळ मदतीचे थेट वाटप केले जाणार आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर थेट खात्यात पैसे जमा होणार असल्याने बळीराजाची दिवाळी गोड होणार आहे.

मदतीव्यतिरिक्त शासनाने खालील महत्त्वाचे निर्णयही घेतले आहेत:
चारा बँकेची निर्मिती: जनावरांच्या चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्यात तात्काळ ‘चारा बँक’ निर्माण केली जाणार आहे.
पंचनामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश: ज्या भागातील शेतकऱ्यांचे पंचनामे अद्याप बाकी आहेत, ते काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या कडक सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत जेणेकरून सर्व लाभार्थ्यांना वेळेवर मदत मिळेल.
लवकरच प्रति हेक्टरी आणि एकरी किती मदत मिळणार, याबद्दलची सविस्तर माहिती समोर येईल. ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत आणि व्हाट्सअँप ग्रुप्सवर नक्की शेअर करा!