Gharkul Yadi 2026 : स्वतःचं हक्काचं आणि पक्कं घर असावं, असं स्वप्न प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं असतं. जर तुम्हीही शासनाच्या ‘घरकुल योजने’च्या प्रतीक्षेत असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे! महाराष्ट्र राज्यात तब्बल ३९ लाख ३१ हजार नव्या घरकुलांची अंतिम प्रतीक्षा यादी लवकरच फायनल केली जाणार आहे. पण थांबा… जर तुम्ही पात्र असूनही तुमचं नाव या यादीत आलं नसेल, तर काळजी करू नका. आजच्या या ब्लॉगमध्ये आपण यादीत नाव नसल्यास काय करायचं, अपात्रतेचे नियम काय आहेत आणि घरकुल मिळण्याची पुढची संपूर्ण प्रक्रिया काय असणार आहे, हे अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत.
२०१८ मध्ये झालेल्या घरकुल सर्वेक्षणानुसार राज्यामध्ये लाखो घरांचे वाटप झाले. मात्र, अनेक गरजू आणि पात्र कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. हीच अडचण ओळखून शासनाने ‘आवास प्लस सर्वेक्षण २०२४’ राबवले. १ एप्रिल २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत लाखो लोकांनी आपले सर्वेक्षण पूर्ण केले. संपूर्ण राज्यातून जवळजवळ ३९ लाखांहून अधिक कुटुंबांची नोंदणी झाली आणि यापैकी सुमारे ५०% लाभार्थ्यांची अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी (Verification) देखील पूर्ण झाली आहे.
“अधिकारी घरी येऊन पडताळणी करून गेले, तरीही फायनल यादीत नाव का आलं नाही?” असा प्रश्न अनेकांना पडला होता. याचं कारण म्हणजे, यादी अंतिम करण्यासाठी ‘ग्रामसभेची’ मंजुरी आवश्यक असते. याच प्रक्रियेचा भाग म्हणून १५ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या ग्रामसभांमध्ये या याद्यांचे वाचन करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. या ग्रामसभेत पात्र लोकांची यादी निश्चित करणे, अपात्र लोकांवर हरकती घेणे आणि सुटलेल्या पात्र नावांच्या नोंदी घेणे अशी अत्यंत महत्त्वाची कामे पार पडली आहेत.