Land Updates on WhatsApp : तुमची स्वतःची किंवा कष्टाने घेतलेली शेतजमीन सुरक्षित आहे ना? अनेकदा आपल्या परस्पर जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर काही खडाखोड होते, फेरफार होतात किंवा नोंदी बदलल्या जातात आणि आपल्याला त्याची भणकही लागत नाही. पण आता चिंता करण्याची काहीच गरज नाही! तंत्रज्ञानाच्या युगात महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि भूमी अभिलेख विभागाने शेतकऱ्यांसाठी ‘ई-संदेश’ (E-Sandesh) नावाची एक भन्नाट आणि अत्यंत उपयुक्त सुविधा आणली आहे. या सुविधेअंतर्गत तुम्ही तुमचा मोबाईल नंबर थेट ७/१२ उताऱ्याला किंवा प्रॉपर्टी कार्डला लिंक करू शकता.
याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, तुमच्या जमिनीच्या कागदपत्रांमध्ये होणारी कोणतीही हालचाल (जसे की नवीन फेरफार, मोजणी, किंवा इतर कोणत्याही नोंदी) तुम्हाला तत्काळ एसएमएस (SMS) आणि व्हॉट्सॲपवर (WhatsApp) अलर्ट स्वरूपात कळवली जाईल. चला तर मग, या डिजिटल सुविधेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची ते सविस्तर जाणून घेऊया.
‘ई-संदेश’ सेवेवर नोंदणी (Registration) कशी करावी?
सर्वांत आधी तुम्हाला शासनाच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल. त्यासाठी notify.mahabhumi.gov.in ही वेबसाईट उघडा.
पोर्टलवर गेल्यानंतर तिथे ‘Register Now’ (आता नोंदणी करा) या पर्यायावर क्लिक करा.
सर्वात आधी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. नियम आणि अटी मान्य करून ‘Verify’ वर क्लिक करा.
तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी (OTP) येईल, तो तिथे टाकून व्हेरिफाय करा.
आधार पडताळणी झाल्यावर सिस्टीम आपोआप तुमचे नाव आणि पत्ता आधारवरून घेईल.
यानंतर तुम्हाला तुमचा सध्या चालू असलेला मोबाईल नंबर आणि व्हॉट्सॲप नंबर द्यायचा आहे. या नंबरवरही ओटीपी येईल, तो टाकून पडताळणी पूर्ण करा. (येथे ईमेल आयडी देणे ऐच्छिक ठेवण्यात आले आहे).
शेवटी तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडून माहिती ‘Submit’ करा. अशा प्रकारे तुमची पोर्टलवरील नोंदणी यशस्वीरीत्या पूर्ण होईल.
येथे वाचा – लाडक्या बहिणींसाठी नवीन GR आला; या दिवशी मिळणार जुलैचा हप्ता
२. तुमची जमीन (Property) कशी ॲड करावी?
नोंदणी पूर्ण झाल्यावर मिळालेल्या लॉगिन आयडीने पोर्टलवर पुन्हा लॉगिन करा.
डॅशबोर्डवर उजव्या बाजूला ‘Tag Property’ असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
तुम्हाला नेमके काय जोडायचे आहे ते निवडा (उदा. शेतजमीन असेल तर ‘सातबारा’ किंवा घर/प्लॉट असेल तर ‘प्रॉपर्टी कार्ड’).
त्यानंतर पुन्हा तुमचा जिल्हा, तालुका, गाव निवडा आणि जमिनीचा सर्वे नंबर किंवा गट नंबर टाका.
जर तुमच्या गट नंबरचे काही उपप्रकार (उदा. अ, ब, क) असतील, तर ते ड्रॉपडाऊनमधून व्यवस्थित निवडून सबमिट करा. आता तुमची प्रॉपर्टी सिस्टीममध्ये यशस्वीरीत्या ‘Tag’ झाली आहे.
३. फी आणि सबस्क्रिप्शन प्रक्रिया:
प्रॉपर्टी ॲड केल्यानंतर तुम्हाला या ई-संदेश सेवेचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागते.
‘Tagged Properties’ मध्ये जाऊन तुम्ही नुकत्याच निवडलेल्या जमिनीच्या नोंदीवर टिक करा आणि ‘Subscribe’ बटनावर क्लिक करा.
या अलर्ट सेवेसाठी शासनाने प्रति प्रॉपर्टी (एका सातबारासाठी) एका वर्षासाठी केवळ ५० रुपये इतके नाममात्र शुल्क ठेवले आहे.
‘Pay Rs 50’ वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने (उदा. QR Code स्कॅन करून, UPI द्वारे किंवा कार्ड/नेट बँकिंगने) सहज पेमेंट करू शकता.
पेमेंट यशस्वी होताच तुम्हाला स्क्रीनवर त्याची अधिकृत पावती (Invoice) जनरेट झालेली दिसेल.
पेमेंट पूर्ण झाले की तुमची ‘ई-संदेश’ सेवा ॲक्टिव्ह होते! आता तुम्ही डॅशबोर्डवर जाऊन ‘View’ (डोळ्याच्या) आयकॉनवर क्लिक केल्यास तुमचा अगदी लेटेस्ट सातबारा उताराही तिथेच पाहू शकता. एका वर्षासाठी फक्त ५० रुपये खर्चून तुम्ही तुमच्या लाखो रुपयांच्या जमिनीची सुरक्षितता आणि मनशांती मिळवू शकता. आजच या सुविधेचा लाभ घ्या आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांनाही ही महत्त्वपूर्ण माहिती नक्की शेअर करा!