गव्हाचे एकरी 30 क्विंटल उत्पादन मिळणार; पहा नवीन फॉर्म्युला

Wheat Crop : शेतकरी मित्रांनो, गव्हाच्या शेतात उभं राहिल्यावर ‘फुटव्यांची’ संख्या पाहून तुम्हाला समाधान वाटतं का? की, “यंदा पुन्हा उत्पादन कमीच येणार,” अशी चिंता सतावते? जर तुम्हाला एकरी ३० क्विंटलपर्यंत गव्हाचे उत्पादन घ्यायचे असेल, तर महागडी खते वापरण्याची गरज नाही. आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला असा एक ‘स्वस्त आणि मस्त’ उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या गव्हाला इतके जबरदस्त फुटवे फुटतील की, शेजारी सुद्धा विचारतील, “भाऊ, नक्की काय जादू केली?” चला तर मग, कमी खर्चात भरघोस उत्पादन देणारे हे सिक्रेट जाणून घेऊया..

गहू उत्पादन वाढीचा फॉर्म्युला

गव्हाचे पीक जोमदार येण्यासाठी फक्त खत टाकून चालत नाही, तर त्याचे टायमिंग साधणे महत्त्वाचे असते. यासाठी प्रामुख्याने काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे:
१. पाणी व्यवस्थापन: पिकाला योग्य वेळी पाण्याचा ताण आणि पुरवठा करणे.
२. खत व्यवस्थापन: आणि इथेच बहुतांश शेतकरी गोंधळतात!

पाणी आणि खताचे गणित कसे जुळवावे?

बऱ्याचदा शेतकरी गव्हाला पाणी देण्याबाबत घाई करतात. लक्षात ठेवा, पहिले पाणी साधारण १५ ते २० दिवसांनी (जमीन वाफसा स्थितीत आल्यावर) दिले पाहिजे. यामुळे पिकाला थोडी विश्रांती मिळते आणि मुळांची वाढ चांगली होऊन फुटवे जोरात येतात. जेव्हा तुमचे पीक २०-२१ दिवसांचे होईल, तेव्हाच खताचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा डोस द्यायचा आहे.

येथे वाचा – हरभऱ्यावरील घाटे अळीला करा खल्लास.. फक्त करा हे सोपे उपाय..

हा आहे तो ‘जादुई’ खत फॉर्म्युला (Urea + Zinc)

गव्हाला १०:२६:२६ किंवा १८:४६:०० सारखी महागडी खते देण्यापेक्षा, पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचे एक सिक्रेट वापरा. ते म्हणजे ‘युरिया आणि झिंक’चे मिश्रण..
प्रमाण: एकरी १ बॅग युरिया (४५ किलो) + ५ किलो झिंक सल्फेट.
का वापरावे?: युरियामुळे पिकाची शाकीय वाढ होते आणि झिंकमुळे पिकाला काळोखी (हिरवेगारपणा) येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जमिनीला भेगा पडल्या असतील तर झिंक मुळांपर्यंत पोहोचून फुटव्यांची संख्या ५० पर्यंत नेण्यास मदत करते.

येथे वाचा – पिक विम्याचा नियम बदलला; आता अशी ठरणार नुकसान भरपाई

खत देण्याची योग्य पद्धत (चूक टाळा)

शेतकरी मित्र अनेकदा एक चूक करतात – आज खत टाकतात आणि उद्या पाणी देतात. यामुळे उन्हात युरिया उडून जातो आणि पिकाला फक्त २०-२५% खत मिळते.
योग्य पद्धत: खताचा १००% रिझल्ट हवा असेल, तर आधी २-३ वाफ्यांना खत टाका आणि लगेच मागून पाणी सोडा. खत टाकल्यापासून २ तासांच्या आत पिकाला पाणी मिळालेच पाहिजे. यामुळे युरिया वाया जात नाही आणि पूर्ण ताकदीने पिकाला लागतो.

दुसरा डोस आणि फवारणी

जर तुम्हाला खत टाकणे शक्य नसेल, तर विज्ञानाने आता ‘नॅनो युरिया’चा पर्याय दिला आहे.
फवारणी: इफ्को (IFFCO) कंपनीचा नॅनो युरिया (५ मिली प्रति लिटर) आणि झिंक (१ ग्रॅम प्रति लिटर) एकत्र करून फवारणी करू शकता. यामुळे कमी खर्चात उत्तम रिझल्ट मिळतो.
दुसरा खत डोस: गव्हाला ५० ते ५५ दिवसांनी (तिसऱ्या पाण्याच्या वेळी) पुन्हा एकदा १ बॅग युरिया आणि ५ किलो झिंक द्यावे.

येथे वाचा – खरीप 2025 या जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी जाहीर.. येथे पहा जिल्हा निहाय यादी

मित्रांनो, शेती परवडायची असेल तर खर्चावर नियंत्रण हवे. गव्हासारख्या पिकाला हजारो रुपयांची महागडी खते घालण्यापेक्षा, गरजेनुसार युरिया आणि झिंकचा समतोल वापर करा. यामुळे तुमचे पैसेही वाचतील आणि कोठार गव्हाने भरून जाईल..

टीप: जर तुम्ही घरच्या वापरासाठी गहू पिकवत असाल, तर रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय पद्धतीवर भर द्या. पण विक्रमी उत्पादन हवे असल्यास वरील फॉर्म्युला नक्की वापरून पहा..

Leave a Comment

Join WhatsApp Group