उन्हाळी टोमॅटो लागवड: ‘हा’ वाण निवडा.. भरघोस नफा पक्का

Summer Tomato Best Variety : शेतकरी मित्रांनो, नमस्कार! उन्हाळ्याची चाहूल लागली की अनेक शेतकऱ्यांच्या मनात एकच विचार येतो – “या उन्हात टोमॅटो लावणं परवडेल का?” कडक ऊन, पाण्याची कमतरता आणि त्यातच डोकेदुखी ठरनारा व्हायरसचा प्रादुर्भाव… या सर्व आव्हानांमुळे अनेकजण हात आखडता घेतात. पण, जर आपण थोडं स्मार्ट नियोजन केलं आणि बाजाराची गरज ओळखून योग्य ‘वाण’ निवडलं, तर हेच उन्हाळी टोमॅटोचं पीक तुम्हाला बक्कळ नफा मिळवून देऊ शकतं. आजच्या ब्लॉगमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत की, २०२६ च्या उन्हाळी हंगामात टोमॅटोची लागवड करताना नेमकं काय गणित मांडायचं?

बाजाराची नब्ज ओळखा: गोल की लांबट?

टोमॅटो लागवडीत पहिली पायरी म्हणजे ‘आपला माल कुठे खपणार आहे?’ हे ठरवणं. बाजारात मुख्यत्वे दोन प्रकारचे टोमॅटो असतात आणि त्यांची मागणीही वेगवेगळी असते:
लंबोळका (अंडाकृती) टोमॅटो: महाराष्ट्रात आणि उत्तर भारतात या प्रकारच्या टोमॅटोला प्रचंड मागणी असते. याची चव जास्त आंबट नसते (न्यूट्रल असते), त्यामुळे आपल्याकडच्या ग्राहकांना तो जास्त भावतो. जर तुम्ही स्थानिक किंवा महाराष्ट्रातील मोठ्या मार्केटला माल पाठवणार असाल, तर डोळे झाकून ‘लंबोळका’ आकाराच्या वाणाची निवड करा.
गोल टोमॅटो: हा टोमॅटो चवीला थोडा आंबट (ॲसिडिक) असतो. याची साल जाड असते, त्यामुळे वाहतुकीसाठी तो चांगला असतो. पण याची खरी मागणी ‘दाक्षिणात्य’ (South Indian) मार्केटमध्ये असते, जिथे सांबर किंवा आंबट चवीच्या पदार्थांसाठी याचा वापर होतो. त्यामुळे तुमचं मार्केट जर दक्षिणेकडील राज्यांशी जोडलेलं असेल, तरच या वाणाकडे वळा.

येथे वाचा – शेतकऱ्यांसाठी खुशखबर! रेशनचा पैसा खात्यात जमा! तुमचे आले का? असे तपासा

व्हायरसला हरवणारे ‘वाण’

उन्हाळ्यात सर्वात मोठी भीती असते ती म्हणजे ‘व्हायरस’ आणि ‘तिरंगा’ रोगाची. त्यामुळे वाण निवडताना केवळ उत्पादनाकडे बघून चालणार नाही, तर त्या वाणामध्ये रोगप्रतिकारक शक्ती किती आहे, हे तपासणं गरजेचं आहे. सध्या बाजारात असे अनेक ॲडव्हान्स वाण उपलब्ध आहेत जे ‘लिफ कर्ल व्हायरस’ (पाने गुंडाळणारा रोग) आणि ‘विल्ट’ (मर रोग) यांसारख्या समस्यांना बऱ्याच अंशी प्रतिकार करू शकतात. आपल्या कृषी सेवा केंद्र चालकाशी किंवा तज्ज्ञांशी चर्चा करून आपल्या भागासाठी (Segment) सुटेबल असणारं वाण निवडा.

येथे वाचा – संक्रांतीला महिलांना डबल गिफ्ट.. खात्यात येणार एवढी रक्कम.. पहा किती पैसे मिळणार?

रोपांची निवड: पाया भक्कम तर इमारत भक्कम

अनेकदा शेतकरी वाण तर भारी निवडतात, पण रोपवाटिकेतून (नर्सरी) रोपे आणताना गफलत करतात. लक्षात ठेवा, निरोगी रोप हेच भरघोस उत्पादनाचं पहिलं गुपित आहे.
ट्रे आणि कप साईज: उन्हाळी हंगामासाठी रोपांची मुळे (Roots) तग धरून राहणं गरजेचं असतं. त्यामुळे ज्या ट्रेमध्ये कोकोपीटचं प्रमाण योग्य आहे आणि कप साईज मोठी आहे, अशाच ट्रेमधील रोपे निवडा.
हार्डनिंग (Hardening): नर्सरीतून थेट शेतात आल्यावर कोवळी रोपे उन्हाचा तडाखा सहन करू शकत नाहीत. त्यामुळे नर्सरी चालकाला विचारून रोपांचं ‘हार्डनिंग’ झालं आहे की नाही, याची खात्री करा.

येथे वाचा – ट्रॅक्टर-अवजार अनुदानाची शेवटची संधी.. ताबडतोब करा हे काम

लागवडीचं तंत्र: अंतर आणि पद्धत

उन्हाळ्यात हवा खेळती राहणं खूप गरजेचं असतं. जर दाटीवाटीने लागवड केली, तर रोगराईला आमंत्रण मिळतं. झिग-झॅग पद्धत: दोन ओळींमध्ये योग्य अंतर ठेवा आणि रोपांची लागवड करताना ‘झिग-झॅग’ (त्रिकोणी) पद्धतीचा वापर करा. यामुळे प्रत्येक झाडाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो आणि हवा खेळती राहते.
दुहेरी ओळ: मल्चिंग पेपरवर दोन्ही बाजूंनी ठराविक अंतरावर लागवड केल्यास उत्पादनात वाढ होते आणि फळांची तोडणी करणंही सोपं जातं.

थोडक्यात सांगायचं तर… उन्हाळी टोमॅटो हे नक्कीच आव्हानात्मक पीक आहे, पण ‘मार्केटची मागणी’, ‘रोगप्रतिकारक वाण’ आणि ‘सुदृढ रोपे’ या त्रिसूत्रीचा वापर केल्यास यश तुमचंच आहे. जुन्या पद्धतींना बाजूला सारून या नवीन टेक्निकने शेती केली, तर तुमचा ‘लाल चिखल’ होण्याऐवजी ‘लाल सोने’ नक्कीच पिकेल!

Leave a Comment

Join WhatsApp Group