summer Onion Basal Dose : शेतकरी मित्रांनो, नमस्कार! तुमचा उन्हाळी कांदा लागवड होऊन साधारण २५ ते ३० दिवस झाले आहेत का? तणनाशकाची फवारणी किंवा खुरपणी उरकली आहे, पण पहिला खताचा डोस अजून बाकी आहे?
जर तुमचे उत्तर ‘हो’ असेल, तर हा ब्लॉग खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण अशा एका जबरदस्त खत नियोजनाबद्दल (Fertilizer Management) बोलणार आहोत, जे तुमच्या कांद्याचे केवळ वजनच वाढवणार नाही, तर त्याचा रंग, आकार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘टिकवणक्षमता’ (Storage Life) १००% वाढवणार आहे.
बाजारात भाव असेल तर विकायचा आणि नसेल तर चाळीत साठवून ठेवायचा, हे गणित जमवायचे असेल तर पाया भक्कम हवा. चला तर मग पाहूया, कांद्यासाठीचा हा ‘पॉवरफुल डोस’!
खताचा पहिला डोस: काय आणि किती वापरावे? (प्रति एकर प्रमाण)
कांद्याची पात जोमदार असेल, तरच कांद्याचे पदर (Layers) वाढतात आणि कांदा मोठा होतो. यासाठी आपल्याला खालीलप्रमाणे खतांचे कॉम्बिनेशन करायचे आहे. (टीप: हे प्रमाण एका एकरासाठी आहे.)
१. सिंगल सुपर फॉस्फेट (दाणेदार): २ बॅग
२. १८:१०:१ (18:10:1): १ बॅग
३. १८:४६ (DAP) किंवा १०:२६:२६: या दोन्हीपैकी कोणतीही १ बॅग (जी उपलब्ध असेल ती)
४. सल्फर (गंधक): १० किलो
५. मायक्रोन्यूट्रियंट्स (सूक्ष्म अन्नद्रव्ये): ५ किलो
६. सिलिकॉन (Silicon): १५ ते २० किलो (हे गेम चेंजर आहे!)
७. ह्युमिक ॲसिड (ग्रॅन्युएल): १ ते २ किलो
महत्त्वाचे: या डोसमध्ये आपल्याला ‘युरिया’ घ्यायचा नाही.
येथे वाचा – नवीन वर्षात रेशनमध्ये मोठा बदल! आता एवढं धान्य मिळणार..
हेच कॉम्बिनेशन का वापरावे? याचे गणित समजून घ्या..
शेतकरी मित्रांनो, आपण वर जे खत सांगितले आहे, त्यामागे एक शास्त्र आहे. नुसते खत टाकून चालत नाही, तर ते पिकाला कसे लागू होते हे समजणे गरजेचे आहे.
पांढऱ्या मुळीचा जोम (Humic Acid): आपण यात ह्युमिक ॲसिड वापरले आहे. हे जमिनीतील पांढऱ्या मुळांची संख्या वाढवते. जेवढ्या जास्त मुळ्या, तेवढे जास्त अन्नद्रव्ये पीक शोषून घेते.
कांद्याची साईज आणि कडकपणा (Phosphorus & Potash): १८:४६ किंवा १०:२६:२६ मधून मिळणारे स्फुरद (Phosphorus) आणि पालाश (Potash) कांद्याची मान जाड करण्यास आणि आकार वाढवण्यास मदत करतात.
कांदा सडणार नाही (Silicon & Sulfur): हे या डोसचे मुख्य वैशिष्ट्य आहे. १५-२० किलो सिलिकॉन आणि १० किलो सल्फर टाकल्यामुळे कांद्याला एक नैसर्गिक संरक्षण कवच मिळते. यामुळे कांद्यावर काजळी येत नाही (Black soot) आणि चाळीत साठवल्यावर कांदा सडत नाही. जर तुम्हाला कांदा ६-७ महिने टिकवायचा असेल, तर सिलिकॉनचा वापर मस्ट आहे.
येथे वाचा – बियाण्यासाठी निधी मंजूर.. उद्यापासून या जिल्ह्यांत भुईमूग–तीळ बियाणे वाटप सुरू होणार..
पाणी व्यवस्थापन: खत टाकल्यावर काय करावे?
खत टाकून झाल्यावर लगेच पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे. एक सोपी टिप लक्षात ठेवा: खत दिल्यानंतर लगेच एक पाणी द्या आणि त्यानंतर फार अंतर न ठेवता दुसरे हलके पाणी द्या. यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो, मुळे ऍक्टिव्ह होतात आणि आपण दिलेला महागडा खताचा डोस पिकाला लगेच लागू पडू लागतो.
येथे वाचा – कापूस विकावा की वाट पहावी? तज्ञांनी स्पष्टच सांगितलं..
शेतकरी मित्रांनो, कांदा हे पीक असे आहे जिथे सुरुवातीचे नियोजनच तुम्हाला शेवटचा नफा मिळवून देते. तुम्ही जर आताच योग्य खतांचा डोस दिला, तर पुढे कांदा फुगवणीसाठी तुम्हाला जास्त खर्च करावा लागणार नाही (फक्त ०:५२:३४ किंवा ०:०:५० पुरेसे ठरेल). हा ‘मास्टर प्लॅन’ वापरा आणि यावर्षी विक्रमी उत्पादन घ्या!