खुशखबर! रेशन दुकानात साखर मिळणार; पहा महिन्याला किती साखर मिळणार?

Ration Card: अंत्योदय रेशन कार्डधारकांसाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तब्बल दीड वर्षांच्या खंडानंतर रेशन दुकानांतून साखर वितरण पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून आवश्यक साखर उपलब्ध झाल्याने, प्रत्येक अंत्योदय कार्डावर प्रतिमहिना 1 किलो साखरेचे वितरण करण्याची तयारी सुरू आहे. या निर्णयामुळे अत्यंत गरीब कुटुंबांना पुन्हा मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

साखर वितरण बंद का झाले होते?

गेल्या दीड वर्षांपासून साखरेसाठी आवश्यक टेंडर प्रक्रिया न झाल्यामुळे रेशन दुकानांतून साखरेचा पुरवठा पूर्णपणे थांबला होता. त्यामुळे लाभार्थी कुटुंबांना बाजारातच 44–45 रुपये प्रतिकिलो या दराने साखर घेण्याची वेळ येत होती. याउलट रेशन दुकानांतून हीच साखर फक्त 20 रुपये किलोला मिळते. त्यामुळे वितरण बंद राहिल्याने गरीब कुटुंबांवर आर्थिक ओझे मोठ्या प्रमाणात वाढले होते.

येथे वाचा – कर्जमाफीचा लाभ हवा असेल तर ‘ही’ अट अनिवार्य; तुम्ही पात्र आहात का?

सरकारचा नवीन निर्णय काय?

नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 तसेच जानेवारी 2026—या तीन महिन्यांसाठी साखरेचे नियतन मंजूर करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा पुरवठा यंत्रणेला सुमारे 5 हजार क्विंटल साखर देण्यात आली असून, संपूर्ण साठा संबंधित गोदामांमध्ये पोहोचला आहे. एका महिन्याचे नियतन आधीच मिळाले असून, टप्प्याटप्प्याने वितरणाला सुरुवातही करण्यात येते आहे.

सणासुदीच्या काळात मोठा दिलासा

बहुतेक कुटुंबांमध्ये गोड पदार्थांची तयारी सण-उत्सवातच केली जाते. त्यामुळे रेशनमधील साखर ही त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. दीड वर्ष साखर न मिळाल्याने अनेकांनी सण साजरे करताना काटकसर करावी लागली होती. आता वितरण पुन्हा सुरू झाल्याने नववर्षाआधीच घरगुती बजेटमध्ये ‘गोडवा’ परत आल्याची भावना अनेक लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

येथे वाचा – महिलांना 2100 रुपये कधी पासून मिळणार? थेट मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं..!

किती कुटुंबांना होणार फायदा?

राज्यात एकूण 87,064 अंत्योदय कार्डधारक आहेत. या सर्वांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडून साखर उपलब्धतेसाठी सतत पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर शासनाने नियतन मंजूर केल्याने दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न सुटला आहे.

येथे वाचा – आज सोयाबीनला मिळतोय 5328 रुपये भाव, पहा तुमच्या जिल्ह्यातील सोयाबीन भाव..

Leave a Comment

Join WhatsApp Group