कर्जमाफीचा लाभ हवा असेल तर ‘ही’ अट अनिवार्य; तुम्ही पात्र आहात का?

Shetkari Karjmafi Update : २०१७ पासून लागू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत पात्र असूनही कर्जमाफी न मिळालेल्या अनेक शेतकऱ्यांनी नागपूर खंडपीठात याचिका केली होती. या प्रकरणावर पुन्हा हालचाली वेगात होत असून संबंधित शेतकऱ्यांकडून आता हमीपत्र घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या हमीपत्रात स्पष्ट नमूद आहे—“मी आयकरदाता नाही. जर तपासणीत उलट निष्पन्न झाले, तर मिळालेली कर्जमाफी परत करावी लागेल.”

दरम्यान, कर्जमाफी न मिळालेल्या ५० शेतकऱ्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. २ मे २०२४ रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने जिल्हा प्रशासन व सहकार विभागाला तात्काळ कारवाईचे निर्देश दिले. त्यानंतर अधिकाऱ्यांची व शेतकऱ्यांची बैठक घेऊन पात्र शेतकऱ्यांची यादी पुणे येथील सहकार आयुक्तांकडे पाठवण्यात आली. मात्र प्रकरण काही काळ दुर्लक्षित राहिले.

येथे वाचा – आज सोयाबीनला मिळतोय 5328 रुपये भाव, पहा तुमच्या जिल्ह्यातील सोयाबीन भाव..

आता पुन्हा प्रक्रिया गती पकडताच अर्जांची तपासणी करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातील आठ शेतकरी पात्र आढळले असून त्यात संदीप उमाकांत दरणे, त्यांच्या आई नलिनी दरणे यांच्यासह अकोला आणि अहिल्यानगर येथील काही शेतकऱ्यांचा समावेश आहे.

६० हजार शेतकऱ्यांचे काय?

२०१७ मधील याच योजनेत तब्बल ६० हजार शेतकरी पात्र ठरले होते. पण महाआयटीकडे पुरेशी माहिती न गेल्याने त्यांचे कर्जमाफीचे प्रस्ताव अडकून पडले. आजतागायत कोणताही स्पष्ट निर्णय न झाल्याने “आमच्या कर्जाचे पुढे काय?” हा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे.

येथे वाचा – महिलांना 2100 रुपये कधी पासून मिळणार? थेट मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं..!

“आमची चूक काय?” शेतकऱ्यांची उद्विग्न प्रतिक्रिया

कर्जमाफी न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांना आजपर्यंत नवीन कर्जच मंजूर झाले नाही. जुने कर्ज थकले आहे, त्यावर व्याज वाढतच आहे.
यामुळे बँकेच्या निवडणुकीतही भाग घेता येत नाही; अगदी स्वतःचे शेअर्सही बँकेकडे गहाण आहेत. शेतकऱ्यांचा थेट सवाल — “पात्र असूनही लाभ मिळाला नाही… तर आमचा दोष नक्की काय?”

Leave a Comment

Join WhatsApp Group