शेळीपालनासाठी चक्क 75% अनुदान.. ‘पोकरा’ योजना.. मोबाईलवरून असा भरा अर्ज..

Sheli Gat Vatap Yojana : शेतकरी मित्रांनो, शेतीला जोडधंदा म्हणून किंवा स्वतंत्र व्यवसाय म्हणून ‘शेळीपालन’ (Goat Farming) कडे तुम्ही आशेने बघताय का? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात ‘पोकरा’ (PoCRA) योजनेअंतर्गत आता शेळी गटासाठी तब्बल ७५% अनुदान दिले जात आहे.

पण अनेकदा योजना चांगली असूनही केवळ “अर्ज कसा करायचा?” हे माहित नसल्यामुळे अनेक गरजू लाभार्थी यापासून वंचित राहतात. म्हणूनच, आजच्या या ब्लॉगमध्ये आपण ‘शेळी गट वाटप’ योजनेसाठी घरबसल्या, आपल्या मोबाईलवरून ऑनलाइन अर्ज कसा करायचा, याची अगदी सोपी आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत. चला तर मग, जाणून घेऊया संपूर्ण प्रक्रिया!

अर्ज करण्यापूर्वी या गोष्टी माहीत हव्यात (पात्रता)
सर्वात आधी हे लक्षात घ्या की, जर तुम्ही भूमिहीन (ज्यांच्याकडे स्वतःची शेती नाही) असाल किंवा विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित महिला असाल, तर या योजनेचा लाभ तुम्हाला प्राधान्याने मिळतो.

आवश्यक कागदपत्रे:
अर्ज भरण्यासाठी बसण्यापूर्वी खालील कागदपत्रे जवळ ठेवा, म्हणजे ऐनवेळी धावपळ होणार नाही:
१. आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक)
२. सक्रिय मोबाईल नंबर
३. जातीचा दाखला (लागू असल्यास)
४. भूमिहीन असल्याचा दाखला (तहसीलदारांचा)
५. विधवा/परित्यक्ता/अपंग असल्यास संबंधित प्रमाणपत्र.

येथे वाचा – एक फवारणी आणि 6 महिने गवताची सुट्टी.. तणांचा दुश्मन तणनाशक.. पहा कोणी वापरावे?

असा करा ऑनलाइन अर्ज (स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया)

पोकरा योजनेचे नियम थोडे बदलले आहेत. आता अर्ज करण्यासाठी NDKSP DBT च्या नवीन पोर्टलवर जावे लागते. घाबरू नका, खालील पायऱ्या फॉलो करा:

१. नोंदणी (Registration) करणे सर्वात महत्त्वाचे!
जर तुम्ही या पोर्टलवर नवीन असाल, तर तुम्हाला आधी नोंदणी करावी लागेल.
जर तुम्ही ‘शेतकरी’ म्हणून नोंदणीकृत असाल तर तुमचा डेटा सिस्टीममध्ये असतोच.
पण जर तुम्ही भूमिहीन लाभार्थी म्हणून अर्ज करणार असाल, तर तुम्हाला स्वतः नव्याने नोंदणी करावी लागते.
त्यासाठी पोर्टलवर जाऊन तुमचा मोबाईल नंबर टाका आणि कॅप्चा कोड सोडवून ‘OTP मिळवा’ वर क्लिक करा. आलेला OTP टाकून व्हेरिफाय करा.

२. आधार ऑथेंटिकेशन (Aadhaar Verification)
मोबाईल व्हेरिफाय झाला की पुढचा टप्पा येतो आधारचा.
तुमचा आधार नंबर टाका.
‘Bio-metric’ की ‘OTP’ यापैकी ‘OTP’ हा पर्याय सोपा पडेल. तो निवडा.
तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर OTP येईल, तो टाकून पडताळणी पूर्ण करा. हे झाल्यावर तुमची सर्व वैयक्तिक माहिती (नाव, जन्मतारीख, फोटो) आपोआप स्क्रीनवर येईल.

३. पत्ता आणि प्रवर्गाची निवड
आता तुम्हाला तुमचा सध्याचा पत्ता, जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचे आहे.
महत्त्वाचे: तुम्ही निवडलेले गाव हे ‘पोकरा’ योजनेच्या टप्पा-२ मध्ये समाविष्ट असणे आवश्यक आहे.
त्यानंतर तुमचा जातीचा प्रवर्ग (SC/ST/Open इ.) निवडा.
जर तुम्ही विधवा, घटस्फोटित किंवा अपंग असाल, तर तिथे ‘हो’ हा पर्याय निवडून त्याचे प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल. जर काहीच लागू नसेल, तर सरळ ‘नाही’ म्हणा.

४. भूमिहीन प्रमाणपत्र अपलोड करा
सर्वात महत्त्वाची स्टेप! तुम्ही भूमिहीन आहात हे सिद्ध करण्यासाठी तहसील कार्यालयातून मिळालेले भूमिहीन प्रमाणपत्र तुम्हाला येथे अपलोड करावे लागेल. हे प्रमाणपत्र कसे काढायचे, याचे व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर सहज मिळतील.

६. शेळीची जात आणि अंतिम सबमिशन
तुम्हाला व्यवसायासाठी कोणती शेळी हवी आहे? उस्मानाबादी, संगमनेरी की स्थानिक? ते निवडा.
यानंतर स्क्रीनवर योजनेच्या अटी आणि शर्ती दिसतील (उदा. एका कुटुंबात एकालाच लाभ, ३ वर्ष व्यवसाय चालू ठेवणे इ.). त्या काळजीपूर्वक वाचा.
शेवटी ‘संमती’ (Consent) आणि ‘घोषणापत्र’ (Self-declaration) वर टिक करून तुमचा अर्ज सबमिट करा.

येथे वाचा – घरीच बनवा 10:26:26 आणि DAP खत; पहा सोपा फॉर्मुला..

तुमचा अर्ज सबमिट झाल्यावर तुम्हाला एक पावती मिळेल. ती डाऊनलोड करून किंवा प्रिंट करून जपून ठेवा. या योजनेत ४ शेळ्या आणि १ बोकड (किंवा १०+१ गट, नियमानुसार) यासाठी हे अनुदान मिळते.
मित्रांनो, ही सुवर्णसंधी सोडू नका. ७५% अनुदान म्हणजे व्यवसायाला मोठी मदत आहे. आजच आपली कागदपत्रे गोळा करा आणि जवळच्या सेतू केंद्रावरून किंवा स्वतः मोबाईलवरून अर्ज करा. शेतकरी मित्रांनो, ही माहिती महत्त्वाची वाटल्यास इतर शेतकरी ग्रुपला आमच्या वेबसाईटची लिंक नक्की शेअर करा..

Leave a Comment

Join WhatsApp Group