Rabi Crop Insurance : यंदाच्या रब्बी हंगामात राज्यातील शेतकऱ्यांसाठी पिकविमा योजनेत महत्त्वाची अद्ययावत भर करण्यात आली आहे. गहू (बागायत), हरभरा आणि रब्बी कांदा या पिकांचा यामध्ये समावेश असून, योजनेंतर्गत सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर ही शेवटची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी १ ते ७ डिसेंबरदरम्यान विशेष जनजागृती सप्ताह आयोजित केला जाणार असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंहचालक उमेश वानखेडे आणि अधीक्षक कृषी अधिकारी माधुरी सोनवणे यांनी दिली.
नोंदणी कुठे कराल?
शेतकरी pmfby.gov.in या राष्ट्रीय पीकविमा पोर्टलवरून थेट ऑनलाईन नोंदणी करू शकतात. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात — भारतीय कृषी विमा कंपनी तर बीड जिल्ह्यात — ICICI Lombard या कंपन्यांमार्फत योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
येथे वाचा – खुशखबर! रेशन दुकानात साखर मिळणार; पहा महिन्याला किती साखर मिळणार?
आवश्यक कागदपत्रे
विमा घेण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल: (1) अॅग्रिस्टॅक फार्मर आयडी, (2) आधार कार्ड, (3) बँक खात्याची माहिती, (4) 7/12 आणि 8-A उतारे
भाडेपट्टी शेती असल्यास नोंदणीकृत भाडेकरार
यासोबतच ई-पीक पाहणी पूर्ण करणे बंधनकारक आहे, असे सोनवणे यांनी स्पष्ट केले.
येथे वाचा – महिलांनो! तारीख ठरली.. लाडक्या बहिणीचे पैसे खात्यात जमा होणार, पहा तारीख..
जिल्हानुसार विमा संरक्षण रक्कम (हेक्टरी प्रीमियमसह)
छत्रपती संभाजीनगर : गहू (बागायत): ₹45,000 संरक्षण — प्रीमियम ₹337.50, हरभरा: ₹36,000 संरक्षण — प्रीमियम ₹270, रब्बी कांदा: ₹90,000 संरक्षण — प्रीमियम ₹675
जालना : गहू (बागायत): ₹45,000 संरक्षण — प्रीमियम ₹450, हरभरा: ₹36,000 संरक्षण — प्रीमियम ₹360
बीड : गहू (बागायत): ₹45,000 संरक्षण — प्रीमियम ₹675, हरभरा: ₹36,000 संरक्षण — प्रीमियम ₹540
रब्बी कांदा: ₹75,000 संरक्षण — प्रीमियम ₹1,125