आता घरबसल्या पिक कर्ज मिळणार.. या जिल्ह्यासाठी सुविधा सुरू.. पहा अर्ज कसा करायचा?

Online Crop Loan : शेतकरी मित्रांनो, पीककर्ज मिळवण्यासाठी बँकेचे उंबरठे झिजवून तुम्ही थकला आहात का? कागदपत्रांची जमवाजमव आणि मंजुरीसाठी लागणारा वेळ यामुळे हवालदिल झाला आहात? तर आता चिंता सोडा.. तुमच्यासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि क्रांतीकारी बातमी आहे. आता तुम्हाला कर्जासाठी बँकेत तासनतास रांगेत उभं राहण्याची गरज नाही. शासनाच्या नव्या डिजिटल पुढाकारामुळे तुम्ही चक्क घरबसल्या कर्जासाठी अर्ज करू शकता आणि तेही अवघ्या काही दिवसांत मंजूर होऊन तुमच्या खात्यात जमा होईल! होय, हे खरं आहे. चला तर मग, जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर…

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांसाठी एक सुखद बदल घडवून आणला आहे. आता पीककर्ज मिळवणं पूर्वीसारखं किचकट राहिलेलं नाही. ‘जनसमर्थ पोर्टल’ (Jan Samarth Portal) च्या माध्यमातून आता शेतकरी बांधव थेट आपल्या मोबाईलवरून किंवा कॉम्प्युटरवरून कर्जासाठी अर्ज करू शकतात. या योजनेसाठी आपल्या राज्यातील एका जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. चला जाणून घेऊया..

योजनेसाठी या जिल्ह्याची निवड

सर्वात आनंदाची बाब म्हणजे, या ऑनलाइन प्रक्रियेसाठी सोलापूर जिल्ह्याची ‘पायलट प्रोजेक्ट’ म्हणून निवड करण्यात आली आहे. म्हणजेच, या योजनेची सुरुवात आपल्या महाराष्ट्रातून, आणि त्यातही सोलापुरातून होत आहे..

येथे वाचा – फक्त 2500 रुपयांत सोलर बसवा; असा कर अर्ज..

काय आहे नेमकं वैशिष्ट्य?

या नवीन प्रणालीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वेग आणि पारदर्शकता.
वेळेची बचत: तुम्ही ऑनलाइन अर्ज केल्यानंतर अवघ्या २ दिवसांत बँकांकडून तुम्हाला पीककर्ज उपलब्ध होऊ शकेल.
त्रास वाचणार: कर्ज मिळवण्यासाठी वारंवार बँकेत जाण्याची कटकट आता संपली आहे.
अकारण नकार नाही: या पोर्टलमुळे शेतकऱ्यांना विनाकारण कर्ज नाकारण्याचे प्रकार बंद होतील आणि गरजू शेतकऱ्याला हक्काचे कर्ज वेळेत मिळेल.
मोफत सुविधा: या ऑनलाइन प्रक्रियेसाठी कोणतेही शासकीय शुल्क आकारले जाणार नाही.

येथे वाचा – गव्हाचे एकरी 30 क्विंटल उत्पादन मिळणार; पहा नवीन फॉर्म्युल

कर्ज मिळवण्यासाठी काय लागेल? (कागदपत्रे आणि पात्रता)

सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत किसान क्रेडिट कार्ड (KCC) द्वारे २ लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज मिळवता येईल. यासाठी खालील गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे:
शेतकरी आयडी (Farmer ID): अर्ज करण्यासाठी हा आयडी असणे बंधनकारक आहे.
आधार कार्ड: मोबाईल नंबरशी लिंक असलेले.
बँक पासबुक
पॅनकार्ड (उपलब्ध असल्यास).

मदत कुठे मिळेल?

जर तुम्हाला स्वतःहून ऑनलाइन अर्ज करणे जमले नाही, तरी काळजी करू नका! जिल्हा आणि तालुका प्रशासनाकडून यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या सेतू केंद्र, महा ई-सेवा केंद्र किंवा ग्राहक सेवा केंद्रात (CSC) जाऊनही अर्ज करू शकता.

येथे वाचा – हरभऱ्यावरील घाटे अळीला करा खल्लास.. फक्त करा हे सोपे उपाय..

अर्ज कुठे करावा?

शेतकरी मित्रांनो, तंत्रज्ञानाची ही मदत घेऊन आपली शेती अधिक प्रगत करण्याची हीच योग्य वेळ आहे. सोलापूरकरांनी या ‘पायलट प्रोजेक्ट’चा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि इतर जिल्ह्यांसाठी एक आदर्श निर्माण करावा. अधिक माहितीसाठी आणि अर्जासाठी www.jansamarth.in या वेबसाईटला भेट द्या

Leave a Comment

Join WhatsApp Group