पेरणी झाली, गहू उगवला, पण म्हणावे तसे फुटवे नाहीत? चिंता नको! आपल्या घरातच पिकाच्या जोमदार वाढीचं रहस्य दडून बसलेलं आहे. रासायनिक खतांचा भारी खर्च टाळून, फक्त गूळ आणि गवऱ्यांच्या मदतीने तुमचं रान कसं हिरवंगार होईल आणि गव्हाचे उत्पादन कसं वाढेल, हे जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.
नमस्कार शेतकरी दादांनो! सध्या सर्वत्र गव्हाची लगबग सुरू आहे. काहींची पेरणी आटोपली असेल, तर काहींचा गहू आता कोवळा वर येत असेल. गव्हाचे पीक घेताना आपल्या सर्वांना सतावणारी एकच काळजी असते – “गव्हाला जास्तीत जास्त फुटवे कसे येतील?” कारण गणित साधं आहे, जितके जास्त फुटवे, तितकंच जास्त उत्पन्न! यासाठी आपण अनेकदा दुकानातील महागडी औषधं आणि रासायनिक खतं वापरतो. पण आज आपण एक असा ‘जुगाड’ पाहणार आहोत, ज्याचा खर्च अगदी नगण्य आहे आणि रिझल्ट मात्र लाखाचा आहे! आपल्या गोठ्यातील आणि स्वयंपाकघरातील वस्तूंपासून गव्हाला काळोखी आणि फुटवे कसे आणायचे, चला पाहूया.
हे ‘अमृत’ बनवण्यासाठी काय काय लागेल? (एका एकरासाठी)
हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोठून काही विकत आणायची गरज नाही. फक्त खालील गोष्टी जमवा:
• पाणी: ५० लिटर (एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये).
• गवऱ्या: ५ किलो (गाई-म्हशीच्या शेणाच्या, शक्यतो ६ महिने जुन्या).
• गूळ: २ किलो (काळा, स्वस्त किंवा जनावरांना खायला घालतो तो गूळ).
येथे वाचा – शेतकऱ्यांनो! पिक विमा निधी आला; पहा पिक विमा कधी मिळणार?
तयार करण्याची सोपी पद्धत:
हा प्रयोग करणं अतिशय सोपं आहे, खालील पायऱ्या नीट समजून घ्या:
पाऊल १: एका ड्रममध्ये ५० लिटर पाणी घ्या.
पाऊल २: या पाण्यात आपल्या ५ किलो गवऱ्या टाका. आता एक गोष्ट लक्षात घ्या, गवऱ्या हलक्या असल्याने त्या पाण्यावर तरंगतात. त्या पूर्णपणे पाण्यात बुडून राहाव्यात म्हणून त्यावर एखादा दगड किंवा विटेचे वजन ठेवा.
टीप: गवऱ्या जितक्या जुन्या असतील, तितका जास्त फायदा होतो.
पाऊल ३: आता २ किलो काळा गूळ घ्या. हा गूळ आधीच थोड्या पाण्यात विरघळून त्याचे पाणी तयार करा आणि मगच ते ड्रममध्ये ओता. बाजारातील महागडा खाण्याचा गूळ वापरण्याची गरज नाही, जो सर्वात स्वस्त आणि खराब गूळ असेल तोच वापरा.
पाऊल ४: आता हे मिश्रण (पाणी + गवऱ्या + गूळ) कमीत कमी ५ दिवस तसेच सावलीत भिजत ठेवा. १०-१५ दिवस ठेवले तरी उत्तमच, पण ५ दिवस तरी नक्की ठेवा.
येथे वाचा – कांद्याचे विक्रमी उत्पादन हवेय? मग ‘ही’ आंतरमशागत देईल 100% रिझल्ट!
याचा पिकाला नेमका काय फायदा होतो?
तुम्ही विचार कराल, “अहो, गवऱ्या आणि गुळाने काय होणार?” तर त्याचं विज्ञान असं आहे:
गवऱ्यांची कमाल: जुन्या गवऱ्यांमध्ये नैसर्गिकरित्या ‘अमिनो ॲसिड’ (Amino Acid) आणि काही प्रमाणात ‘ह्युमिक ॲसिड’ तयार होतं. यामुळे गव्हाची पानं रुंद आणि हिरवीगार होतात. पिकाची सूर्यप्रकाश शोषून घेण्याची क्षमता (प्रकाशसंश्लेषण) वाढते, ज्यामुळे पीक जोमाने वाढतं.
गुळाचा गोडवा: गुळामुळे जमिनीतील मित्र जिवाणूंची संख्या प्रचंड वाढते. तसेच या द्रावणातून पिकाला नैसर्गिकरित्या NPK (नत्र, स्फुरद, पालाश) चा पुरवठा होतो.
येथे वाचा – कांदा फुगवणीचा ‘बाप’ कोण? 0:52:34 की 0:42:47? कोणतं खत कधी वापरावं?
गव्हाला हे द्रावण द्यायचे कसे?
५-६ दिवस हे मिश्रण मुरल्यानंतर तुम्ही ते खालीलपैकी कोणत्याही पद्धतीने देऊ शकता:
• मोकळं पाणी (Flood Irrigation): जर तुम्ही पाटाने पाणी देत असाल, तर ड्रमला एक तोटी (नळ) बसवा आणि पाण्याची बारीक धार मुख्य पाटात सोडा. हे पाणी सर्व वाफ्यांना पोहोचेल.
• मॅन्युअली: वेळ असेल तर डब्याने थोडे-थोडे पाणी पिकाला ओतू शकता.
• ड्रीप किंवा स्प्रिंकलरने: जर तुम्हाला हे ड्रीप किंवा स्प्रिंकलर मधून द्यायचे असेल, तर एक महत्त्वाची काळजी घ्या – हे द्रावण कपड्याने स्वच्छ गाळून घ्या. गाळलं नाही तर कचरा अडकून ड्रीपचे फिल्टर किंवा नोझल चोक-अप होऊ शकते.
शेतकरी मित्रांनो, हा उपाय अगदी घरगुती आहे. याचा वापर केल्यानंतर ४ ते ५ दिवसांतच तुम्हाला गव्हामध्ये बदल दिसायला लागेल. गहू काळाभोर पडेल आणि फुटव्यांची संख्या वाढलेली दिसेल.
खर्च काहीच नाही, पण फायदा मोठा आहे. यंदाच्या हंगामात हा प्रयोग नक्की करून पहा आणि तुमचे अनुभव आम्हाला कमेंट करून कळवा. कारण आपला शेतकरी राजा कमी खर्चात समृद्ध झाला पाहिजे, हीच आमची इच्छा!
येथे वाचा – लाडक्या बहिणींना ‘नवीन वर्षाचं गिफ्ट’.. जानेवारीत या दिवशी 4500 रुपये मिळण्याची शक्यता..