शेतकरी मित्रांनो, सध्या मक्याच्या बाजारात एक मोठी चर्चा सुरू आहे, ती म्हणजे “मक्याची निर्यात जोरात सुरू आहे.” साहजिकच, जेव्हा आपण निर्यातीबद्दल ऐकतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर वाढलेले बाजारभाव येतात. खरचं आता भाव वाढणार का? आणि शेतकऱ्यांनी काय करावे? आजच्या या पोस्टमध्ये आपण मका बाजाराची ‘इनसाईड स्टोरी’ जाणून घेणार आहोत.
मका निर्यात वाढली..
सुरुवात एका चांगल्या बातमीने करूया. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी देशातून होणारी मक्याची निर्यात तब्बल २० टक्क्यांनी वाढली आहे. भारतीय मक्याला परदेशातून मागणी आहे, ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. पण मग प्रश्न उरतो की, या तेजीचा फायदा स्थानिक शेतकऱ्याला का मिळत नाहीये?
सध्या आपल्या बाजारात काय चालू आहे?
सध्याची मार्केटची स्थिती पाहिली तर मक्याचे भाव एका ठराविक टप्प्यावर अडकलेले दिसतात:
सरासरी भाव: १७०० ते १९०० रुपये प्रतिक्विंटल.
प्रोसेसिंग क्वालिटी (चांगला मका): २००० ते २१०० रुपये.
महाराष्ट्र: आपल्या राज्यात साधारणतः १८०० ते १९०० रुपयांचा भाव सुरू आहे.
येथे वाचा – जमिनीचे 100 वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड मोबाईलवर! फक्त 5 मिनिटांत असे करा डाऊनलोड
मग आता भाव वाढणार का?
शेतकरी मित्रांनो, पुढच्या महिनाभरात दरात खूप मोठी उलाढाल होण्याची शक्यता तज्ज्ञांना वाटत नाही.
अंदाज: मक्याचे दर १७०० ते २१०० रुपयांच्या रेंजमध्येच राहण्याची शक्यता आहे.
रब्बी हंगाम: रब्बीतही उत्पादन चांगलं येण्याची चिन्हं आहेत, त्यामुळे तुटवडा भासून दर अचानक वाढतील, अशी आशा सध्या तरी धूसर आहे.
येथे वाचा – शेतकऱ्यांसाठी पुढील 48 तास महत्त्वाचे.. या ठिकाणी धो-धो पाऊस कोसळणार.. तोडकर हवामान अंदाज
भाव न वाढण्याची ‘इनसाईड स्टोरी’ (नेमकी कारणं)
तुम्ही टायटलमध्ये वाचल्याप्रमाणे, निर्यात जोरात असूनही भाव का वाढले नाहीत, याची दोन प्रमुख आणि ‘आतली’ कारणं खालीलप्रमाणे आहेत:
उत्पादनाचा विक्रम: यावर्षी खरीप हंगामात मक्याचं उत्पादन प्रचंड वाढलं आहे. गेल्या वर्षी २४८ लाख टन उत्पादन होतं, जे यंदा १४ टक्क्यांनी वाढून २८३ लाख टनांवर गेलं आहे. म्हणजेच, बाजारात मालाची आवक भरपूर आहे.
इथेनॉलचं गणित बदललं: हे खूप महत्त्वाचं कारण आहे. मागच्या काही काळात इथेनॉलसाठी मक्याला मोठी मागणी होती, ज्यामुळे भाव टिकून होते. पण आता सरकारने इथेनॉल बनवण्यासाठी पुन्हा एकदा उसाचा रस आणि तांदळाचा पर्याय खुला केला आहे. शिवाय, एफसीआयने (FCI) सवलतीच्या दरात तांदूळ उपलब्ध करून दिल्याने कंपन्यांची मक्याची मागणी कमी झाली आहे.
थोडक्यात: पुरवठा वाढलाय (बंपर पीक) आणि मोठी मागणी (इथेनॉलची) कमी झालीय. यामुळे निर्यातीचा जोर असूनही स्थानिक भाव दबावात आहेत.
येथे वाचा – जमिनीचे 100 वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड मोबाईलवर! फक्त 5 मिनिटांत असे करा डाऊनलोड
शेतकऱ्यांनी काय करावे?
हमीभावाने खरेदी सुरू असली तरी तांत्रिक अडचणींमुळे (उदा. पीक पेरा नोंद नसणे) तिथेही गती कमी आहे. त्यामुळे, जर तुम्हाला खाजगी बाजारात २१०० रुपयांच्या आसपास भाव मिळत असेल, तर तो सध्याच्या परिस्थितीनुसार चांगला मानला पाहिजे.