सध्या राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, यामुळे हजारो लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सध्या अनेक महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे तो म्हणजे आपल्याला पुन्हा eKYC करावी लागणार का? खरं काय आहे? चला जाणून घेऊया..
महिलांना खरचं पुन्हा eKYC करावी लागणार?
सरकारने स्पष्ट केले आहे की, सर्व महिलांना eKYC पुन्हा करावी लागणार नाही. मात्र, ज्या महिलांकडून eKYC करताना चुकीची माहिती भरली गेली आहे, प्रक्रिया अपूर्ण राहिली आहे किंवा आवश्यक कागदपत्रे दिली गेली नाहीत, अशा लाभार्थ्यांसाठी दुरुस्तीची एकदाची संधी देण्यात आली आहे. ही संधी वेळेत न वापरल्यास योजनेचा लाभ थांबू शकतो, म्हणूनच ही माहिती जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
येथे वाचा – आता कांद्याचे दिवस बदलणार; बांग्लादेशकडून अजून मोठा निर्णय, भाव किती वाढणार?
कोणत्या महिलांना पुन्हा eKYC करावी लागेल?
लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत असलेल्या अविवाहित महिला, विधवा महिला, घटस्फोटीत महिला तसेच ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत. अशा लाभार्थींना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत eKYC पुन्हा करून चुका दुरुस्त करता येणार आहेत. मात्र लक्षात ठेवा—ही सुविधा फक्त एकदाच उपलब्ध आहे.
eKYC दुरुस्ती कशी करायची?
eKYC दुरुस्तीसाठी महिलांनी खालील सोपी प्रक्रिया पूर्ण करावी—
1. ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
2. ‘येथे क्लिक करा’ या पर्यायावर क्लिक करून आधार क्रमांक आणि कॅप्चा भरा.
3. ‘मी सहमत आहे’ निवडून OTP पाठवा वर क्लिक करा.
4. आधारला जोडलेल्या मोबाईलवर आलेला OTP टाकून पुढे जा.
5. पुढे तुम्ही विवाहित किंवा अविवाहित आहात, हा पर्याय निवडावा लागेल. यावर पुढील माहिती ठरते.
स्थितीनुसार आवश्यक कागदपत्रे
विवाहित महिला
पती जिवंत असल्यास : पतीचा आधार क्रमांक आणि OTP द्वारे पडताळणी
पतींचे निधन / घटस्फोट असल्यास : मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाची कागदपत्रे ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी अंगणवाडी सेविकेकडे सादर करण्यास संमती
अविवाहित महिला
वडील जिवंत असल्यास : वडिलांचा आधार क्रमांक आणि OTP पडताळणी…
वडिलांचे निधन असल्यास : मृत्यू प्रमाणपत्र अंगणवाडी सेविकेकडे देण्यास संमती…
शेवटची महत्त्वाची स्टेप
जात प्रवर्ग निवडल्यानंतर, कुटुंबातील कोणीही कायम सरकारी नोकरीत नाही किंवा करदाता नाही, हे ‘नाही’ असे घोषित करावे. अंतिम घोषणापत्रावर टिक करून eKYC सबमिट केल्यानंतर eKYC यशस्वी झाल्याचा संदेश स्क्रीनवर दिसेल.