Former loan waiver : नमस्कार शेतकरी मित्रांनो! सध्या गावच्या पारापासून ते व्हॉट्सॲप ग्रुपपर्यंत एकच चर्चा जोरात आहे, ती म्हणजे “कर्जमाफी कधी होणार? घोषणा होतायत, पण हातात काही ठोस पडत नाहीये. आता तर नवीन एक बातमी आली आहे की सरकारने बँकांकडून माहिती गोळा करायला सुरुवात केली आहे. पण यातही एक अशी ‘मेख’ मारून ठेवली आहे की ज्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे. काय आहे हा नक्की प्रकार? अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना खरंच यातून वगळलं जाणार आहे का? चला, या सगळ्या गोंधळाचा सविस्तर आढावा घेऊया.
माहिती संकलनाचे काम सुरू, पण तारीख कुठली?
सहकार विभागाने आता जिल्हा बँका आणि सोसायट्यांना कामाला लावलं आहे. थकबाकीदार शेतकरी आणि नियमित कर्ज फेडणारे शेतकरी यांची यादी बनवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. पण खरी भानगड इथेच आहे! जी माहिती मागवली जात आहे, ती जून २०२५ पर्यंतचीच आहे अशी चर्चा आहे.
याचा सरळ अर्थ असा होतो की, ज्या शेतकऱ्यांचे २०२५ नंतर नुकसान झाले आहे, किंवा जे त्यानंतर थकबाकीदार झाले आहेत, त्यांचं काय?
येथे वाचा – शेतकऱ्यांसाठी खुशखबर! रेशनचा पैसा खात्यात जमा! तुमचे आले का? असे तपासा
अतिवृष्टीग्रस्तांवर अन्याय होणार?
शेतकरी नेते अजित नवले यांनी यावर बोट ठेवलंय. त्यांचं म्हणणं आहे की, २०२५ मध्ये राज्यात भयंकर अतिवृष्टी झाली. त्यात शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं. जर सरकार फक्त २०२५ च्या आधीचीच किंवा जून पर्यंतचीच माहिती गोळा करत असेल, तर त्यानंतर अतिवृष्टीचा फटका बसलेले अनेक शेतकरी या कर्जमाफीच्या कक्षेतून बाहेर फेकले जातील. हा सरळ-सरळ शेतकऱ्यांचा ‘छळ’ करण्याचा प्रकार आहे, असा आरोप आता होऊ लागला आहे.
येथे वाचा – ट्रॅक्टर-अवजार अनुदानाची शेवटची संधी.. ताबडतोब करा हे काम
सरकारचं आश्वासन आणि वास्तवातील तफावत
एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छातीठोकपणे सांगितलंय की ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफी करणार. यासाठी एप्रिल २०२६ मध्ये समितीचा अहवाल येईल. पण दुसरीकडे, जमिनीवर जी माहिती गोळा केली जातेय, त्याचे रकाने (Columns) पाहून बँक कर्मचारीही चक्रावून गेलेत.
थकबाकीदारांसाठी तब्बल ८४ रकान्यांमध्ये माहिती द्यायची आहे.
नियमित कर्जदारांसाठी ३२ रकान्यांमध्ये माहिती भरली जात आहे.
यात शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती, आधार, पॅन, जमिनीचा तपशील सगळंच खच्चून भरून घेतलं जातंय. त्यामुळे या प्रक्रियेला वेळ लागणार हे नक्की.
येथे वाचा – संक्रांतीला महिलांना डबल गिफ्ट.. खात्यात येणार एवढी रक्कम.. पहा किती पैसे मिळणार?
सरकारी तिजोरी आणि शेतकऱ्यांची झोळी
हे सगळं सुरू असताना एक कटू सत्य नाकारून चालणार नाही. राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे हे लपून राहिलेलं नाही. ‘लाडकी बहीण’ आणि इतर योजनांमुळे आर्थिक शिस्त बिघडली आहेच. अशा वेळी ४० हजार कोटींचं कर्ज माफ करण्यासाठी सरकार पैसा आणणार कुठून? हा खरा प्रश्न आहे.
सरकार निधीअभावी अनेक योजनांचे पैसे रोखून धरत आहे, मग कर्जमाफीच्या वेळीही “तारीख पे तारीख” मिळणार का? अशी शंका शेतकऱ्यांना येणं साहजिक आहे.
थोडक्यात सांगायचं तर… शेतकरी सध्या दुहेरी संकटात आहे – एकीकडे निसर्गाचा लहरीपणा आणि दुसरीकडे हमीभावापेक्षा कमी दर. अशात कर्जमाफी हाच एक आशेचा किरण आहे. पण सरकारने यात तांत्रिक मुद्दे काढून किंवा तारखांचा खेळ करून गरजू शेतकऱ्यांना, विशेषतः अतिवृष्टीग्रस्तांना वार्यावर सोडू नये, हीच अपेक्षा.