लाडक्या बहिणींनो! पुन्हा eKYC करा.. नवीन आँप्शन आले..

लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या हजारो महिलांसाठी राज्य सरकारकडून मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. eKYC करताना चुकून चुकीची माहिती भरली गेली असेल किंवा प्रक्रिया अपूर्ण राहिली असेल, तर आता ती सुधारण्याची एकदाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अविवाहित, विधवा, घटस्फोटीत महिला किंवा ज्यांच्या पती/वडिलांचे निधन झाले आहे—अशा सर्व लाभार्थ्यांना आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत eKYC पुन्हा करून चुका दुरुस्त करता येणार आहेत. ही सुविधा केवळ एकदाच वापरता येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

येथे वाचा – लाडक्या बहिणींना धक्का!  ‘या‘ जिल्ह्यात तब्बल ३० हजार महिलांचे अर्ज रद्द..

eKYC दुरुस्तीची प्रक्रिया कशी कराल?

1. ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. ‘येथे क्लिक करा’ या बटणावर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक व कॅप्चा भरा.
3. ‘मी सहमत आहे’ निवडून ओटीपी पाठवा वर क्लिक करा. आधारला जोडलेल्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून पुढे जा.
4. त्यानंतर तुम्ही विवाहित आहात की अविवाहित हा पर्याय निवडावा लागेल. या निवडीवर पुढील आवश्यक माहिती ठरते.

येथे वाचा – लाडक्या बहिणींना धक्का!  ‘या‘ जिल्ह्यात तब्बल ३० हजार महिलांचे अर्ज रद्द..

स्थितीनुसार लागणारी माहिती आणि कागदपत्रे

१. विवाहित महिला

पती जिवंत असल्यास: पतीचा आधार क्रमांक व त्यांच्याकडे आलेल्या ओटीपीद्वारे पडताळणी करावी.

पतींचे निधन / घटस्फोट: मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाची कागदपत्रे ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी अंगणवाडी सेविकेकडे सादर करण्यास संमती द्यावी.

येथे वाचा – लाडक्या बहिणींना धक्का!  ‘या‘ जिल्ह्यात तब्बल ३० हजार महिलांचे अर्ज रद्द..

२. अविवाहित महिला

वडील जिवंत असल्यास: वडिलांचा आधार क्रमांक व त्यांच्या मोबाईलवर आलेल्या ओटीपीद्वारे पडताळणी पूर्ण करावी.

वडिलांचे निधन: मृत्यू प्रमाणपत्राची प्रत अंगणवाडी सेविकेकडे देण्यास संमती आवश्यक.

शेवटची पायरी

जात प्रवर्ग निवडल्यानंतर, कुटुंबातील कोणीही कायम सरकारी नोकरीत नाही किंवा करदाता नाही, हे ‘नाही’ निवडून घोषित करावे. अंतिम घोषणापत्रावर टिक करून eKYC सबमिट केल्यावर, तुमच्या आधार क्रमांकाची केवायसी यशस्वी झाल्याचा संदेश स्क्रीनवर दिसेल.

Leave a Comment

Join WhatsApp Group