महिलांना 2100 रुपये कधी पासून मिळणार? थेट मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं..!

Ladki Bahin Yojana : राज्यात सुरू असलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना महिलांसाठी मोठा आधार ठरली आहे. पात्र लाभार्थींना दरमहा 1500 रुपयांची मदत दिली जाते. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने या योजनेतील आर्थिक मदत वाढवण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेत आल्यास दरमहा 2100 रुपये देऊ, अशी घोषणा करण्यात आली होती. सध्या महायुतीच सरकार चालवत असूनही महिलांना अद्याप 1500 रुपयांवरच समाधान मानावे लागत आहे.

याचदरम्यान या योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना मिळणाऱ्या वाढीव आर्थिक मदतीविषयी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी हा मुद्दा स्पष्ट केला.

येथे वाचा – गव्हाची उशिरा पेरणी करायची? घाबरू नका! गहू उत्पादन 20% वाढवण्याचा फॉर्म्युला..

लाडक्या बहिणींना वाढीव रक्कम कधी मिळणार?

पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने “लाडकी बहीण योजनेतील निधी वाढवण्याबाबत सरकारचा निर्णय कधी होणार?” असा थेट सवाल उपस्थित केला. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी या अधिवेशनात होणार का, अशीही विचारणा झाली.

येथे वाचा – तुरीवर शेवटची फवारणी आणि मिळवा टपोरे दाणे,  आळी 100% खल्लास..

यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, “योग्य वेळीच योग्य निर्णय घेतले जातील. काळजी करण्याचे कारण नाही.” मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरानंतर सध्यातरी आर्थिक मदत वाढण्याची तातडीची शक्यता कमी दिसत आहे. मात्र, भविष्यात या योजनेतील लाभ वाढू शकतात, अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुढील काळात सरकार कोणता निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

येथे वाचा – कांदा उत्पादकांसाठी खुशखबर! कांद्याचे भाव वाढणार; हा निर्णय होणार गेमचेंजर! 

Leave a Comment

Join WhatsApp Group