लाडक्या बहिणींना धक्का!  ‘या‘ जिल्ह्यात तब्बल ३० हजार महिलांचे अर्ज रद्द..

लाडकी बहीण योजनेवर राज्यभरात चर्चेचा भडका उडाला असतानाच एक मोठी माहिती समोर आली आहे. या योजनेतील लाभार्थ्यांचे ई-केवायसी व क्रॉस व्हेरिफिकेशन वेगात सुरू असून तपासणीत अनेक अनियमितता उघडकीस येत आहेत. त्यातच बुलढाणा जिल्ह्यात तब्बल ३० हजार महिलांचे अर्ज रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे.

बुलढाण्यात मोठी कारवाई – ३०,००० हून अधिक महिलांचा लाभ बंद

बुलढाणा जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा फायदा घेणाऱ्या सुमारे ६ लाख ४० हजार महिलांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत विविध कारणांमुळे एकूण ३०,३०४ महिलांचा लाभ रद्द करण्यात आला. त्याशिवाय स्वतःहून लाभ बंद करण्याची विनंती करणाऱ्या ३९० महिलांचे अर्जही रद्द करण्यात आले आहेत.

महिला व बालकल्याण विभागाने पात्र महिलांना तातडीने ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा त्यांचा लाभ बंद होऊ शकतो.

येथे वाचा – हरभऱ्याला लागतील फुलेच फुले.. हरभरा दुसरी फवारणी

अनेक जिल्ह्यांमध्येही अर्ज रद्द – पात्रतेची काटेकोर पडताळणी

राज्यातील इतर अनेक जिल्ह्यांतूनही अर्ज रद्द झाल्याचे अहवाल मिळत आहेत. पात्रतेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिला मोठ्या प्रमाणात आढळून येत असून, लाखो अर्जांची छाननी सुरू आहे. केवायसी प्रक्रियेच्या आधारे केवळ पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.

विधानसभेत आदिती तटकरे यांची माहिती

या संपूर्ण प्रक्रियेबाबत विधानसभेत मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाचे तपशील मांडले. योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात २ कोटी ६३ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २ कोटी ४३ लाखांहून अधिक अर्ज मंजूर करण्यात आले. मात्र छाननीदरम्यान मोठ्या प्रमाणात अर्ज बाद झाले असून काही शासकीय कर्मचारी महिलांनीही चुकीने लाभ घेतल्याचे समोर आले आहे. संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

येथे वाचा – कांदा निर्यातीनंतर दरात मोठा बदल; पहा सर्व कांदा बाजार भाव..!

Leave a Comment

Join WhatsApp Group