महिलांनो! तारीख ठरली? लाडक्या बहिणीचे पैसे खात्यात जमा होणार, पहा तारीख..

Ladki Bahin Installment Date: राज्यातील माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो पात्र महिलांसाठी अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. नोव्हेंबर महिन्याचा थकीत हप्ता देण्याला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला असून, अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या निर्णयाची अधिकृत मंजुरी आता प्राप्त झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि लागू असलेल्या आचारसंहितेमुळे हप्ता वितरण थांबले होते, त्यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र सरकारच्या ताज्या निर्णयाने हा प्रश्न अखेर मिटला आहे.

८ डिसेंबर २०२५ रोजी राज्य शासनाने नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी आवश्यक निधी वितरित करण्यास औपचारिक मंजुरी दिली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने याबाबतचा शासकीय निर्णय (GR) जारी केला असून, सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या सर्व प्रवर्गांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये केवळ अनुसूचित जाती प्रवर्गासाठीच तब्बल २६३ कोटी ४५ लाख रुपये वाटपाला मंजुरी मिळाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या मंजुरीनंतर पुढील पाऊल म्हणून महिला व बालविकास मंत्रालय लवकरच हप्ता जमा होण्याची अधिकृत तारीख जाहीर करणार आहे. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात हा हप्ता DBT पद्धतीने थेट जमा केला जाणार असल्याने, सर्व पात्र महिलांनी अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Comment

Join WhatsApp Group