लाडक्या बहिणींना ‘नवीन वर्षाचं गिफ्ट’.. जानेवारीत या दिवशी 4500 रुपये मिळण्याची शक्यता..

Ladki Bahin Installment  : ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नसल्याने अनेक महिला चिंतेत होत्या. मात्र, आता ही प्रतीक्षा फळाला येण्याची शक्यता असून, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सरकार लाडक्या बहिणींना सुखद धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

एकत्रित तीन हप्ते मिळणार?

डिसेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरले असतानाही, नोव्हेंबरचा हप्ता जमा न झाल्याने “पैसे कधी येणार?” अशी विचारणा सर्वत्र होत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि आगामी जानेवारी महिन्याचे पैसे एकत्रितपणे देण्याचा विचार करत आहे. जर असे झाले, तर जानेवारी महिन्यात लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट ४५०० रुपये (तिन्ही महिन्यांचे मिळून) जमा होऊ शकतात. अद्याप याबाबत अधिकृत शासन निर्णय आलेला नसला, तरी लवकरच घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.

येथे वाचा – रेशन सुरू ठेवण्यासाठी ताबडतोब करा हे काम; शेवटची तारीख आली जवळ…

पैसे लांबणीवर जाण्याचे कारण काय?

हप्ता जमा होण्यास होत असलेल्या विलंबामागे सध्याची निवडणूक प्रक्रिया कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. राज्यात उद्या नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान पार पडत असून, २१ डिसेंबरला निकाल जाहीर होईल. या निवडणूक कामांच्या व्यस्ततेमुळे आणि आचारसंहितेच्या तांत्रिक बाबींमुळे सध्या पैसे जमा करणे प्रशासनाला कठीण जात आहे. त्यामुळेच, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जानेवारीत पैसे जमा केले जाऊ शकतात.

महत्त्वाची सूचना: ३१ डिसेंबरपूर्वी हे काम उरका..

पैसे कधीही जमा झाले तरी ते मिळवण्यासाठी तुमचे खाते ‘अपडेट’ असणे अत्यंत गरजेचे आहे.
योजनेचा लाभ यापुढेही सुरू ठेवण्यासाठी KYC (केवायसी) करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
यासाठी ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत दिली आहे.
ज्यांनी केवायसी केली नसेल, त्यांना यापुढील हप्ते मिळणार नाहीत आणि त्यांचे नाव योजनेतून वगळले जाऊ शकते. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून घरबसल्या ऑनलाईन पद्धतीनेही ही प्रक्रिया सहज पूर्ण करू शकता.
त्यामुळे पैशांची वाट पाहताना केवायसीची प्रक्रिया मात्र तातडीने पूर्ण करून घ्या..

येथे वाचा – शेतकऱ्यांनो! मोफत बियाणे योजना सुरू.. मोबाईलवरून भरा अर्ज.. पहा पात्र जिल्ह्यांची यादी..

Leave a Comment

Join WhatsApp Group