Kanda Bajar bhav Lasalgaon : आज, १६ डिसेंबर रोजी राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची एकूण १ लाख १० हजार ६०८ क्विंटल इतकी आवक नोंदवण्यात आली. या वाढलेल्या आवकेचा बाजारभावांवर वेगवेगळ्या ठिकाणी परिणाम दिसून आला.
लासलगाव बाजारात उन्हाळी कांद्याला किमान ५०० रुपये तर सरासरी २,२०० रुपये दर मिळाला. पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटमध्ये किमान दर ६०० रुपये असून सरासरी भाव २,४०० रुपये राहिला.
नाशिक बाजारात उन्हाळी कांद्याचे दर तुलनेने कमी असून किमान ४०० रुपये तर सरासरी १,३५० रुपये मिळाले. चांदवड बाजारात दर २,००० रुपये, भुसावळ बाजारात ८०० रुपये, रामटेकमध्ये १,३०० रुपये, तर देवळा बाजारात उन्हाळी कांद्याला २,१०० रुपयांपर्यंत दर मिळाल्याचे चित्र आहे.
दरम्यान, लाल कांद्याच्या बाबतीत सोलापूर बाजारात किमान १०० रुपये तर सरासरी १,७०० रुपये दर नोंदवण्यात आला. नागपूर बाजारात सरासरी दर २,२५० रुपये, देवळा बाजारात २,३०० रुपये, तर पुणे बाजारात लोकल कांद्याला १,९०० रुपये भाव मिळाला.
येथे वाचा – मिरचीने दिला शेतीला नवा स्वाद; 40 गुंठ्यांतून 12 लाखांचे उत्पन्न..
पोळ कांद्याच्या दरांकडे पाहिले असता, नाशिक बाजारात सरासरी १,८०० रुपये, तर पिंपळगाव मार्केटमध्ये २,५५० रुपयांपर्यंत दर मिळाल्याची माहिती आहे