Jamin Kharedi Anudan : स्वतःचा एखादा जमिनीचा तुकडा असावा, तिथे घाम गाळून आपलं सोनं पिकवावं, हे स्वप्न उराशी बाळगून अनेकजण जगत असतात. पण वाढते जमिनीचे भाव आणि आर्थिक परिस्थितीमुळे हे स्वप्न अनेकदा अधुरंच राहतं. मात्र, आता काळजी नसावी! राज्य सरकारने ‘दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजने’ अंतर्गत एक मोठे पाऊल उचलले आहे. नुकतीच, २३ डिसेंबर २०२५ रोजी राज्य शासनाने या योजनेसाठी तब्बल २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे आता पात्र लाभार्थ्यांना जमीन खरेदीसाठी हक्काचे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नेमकी ही योजना काय आहे? कोणाला याचा लाभ मिळणार? आणि अर्ज कसा करायचा? चला, सविस्तर जाणून घेऊया..
किती मिळणार अनुदान? (Land Subsidy)
या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात मिळणारे आर्थिक साहाय्य. जमिनीच्या प्रकारानुसार शासनाने अनुदानाची रक्कम निश्चित केली आहे:
कोरडवाहू जमीन (Jirayat Land): तुम्ही ४ एकरापर्यंत जमीन खरेदी करू शकता.
शासनाकडून प्रति एकर ५ लाख रुपये याप्रमाणे जास्तीत जास्त २० लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळते.
बागायत जमीन (Bagayat Land):
बागायती जमिनीसाठी मर्यादा २ एकरापर्यंत आहे.
यासाठी प्रति एकर ८ लाख रुपये याप्रमाणे जास्तीत जास्त १६ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते.
थोडक्यात सांगायचे तर, पात्र ठरलेल्या भूमिहीन लाभार्थ्याला ही जमीन १००% अनुदानावर (म्हणजेच पूर्णपणे मोफत) मिळते..
येथे वाचा – आता घरबसल्या पिक कर्ज मिळणार.. या जिल्ह्यासाठी सुविधा सुरू.. पहा अर्ज कसा करायचा?
कोणासाठी आहे ही योजना?
महाराष्ट्र शासनातर्फे प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या योजना राबवल्या जातात:
अनुसूचित जाती व नवबौद्ध बांधवांसाठी: कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना.
अनुसूचित जमाती (ST) बांधवांसाठी: आदिवासी सबळीकरण व स्वाभिमान योजना.
या दोन्ही योजनांचा मुख्य उद्देश हाच आहे की, समाजातील भूमिहीन घटकांना जमिनीचा हक्क मिळावा आणि त्यांना स्वावलंबी होता यावे.
ही प्रक्रिया नेमकी कशी चालते?
ही योजना यशस्वी होण्यासाठी ‘जमीन विकणारा’ आणि ‘जमीन घेणारा’ या दोघांचा सहभाग महत्त्वाचा असतो.
जमीन विक्रीचा प्रस्ताव: तुमच्या गावातील कोणताही शेतकरी (तो कोणत्याही जाती/प्रवर्गाचा असू शकतो – Open, OBC, SC, ST) आपली जमीन विकण्यास इच्छुक असेल, तर तो या योजनेअंतर्गत जमीन विक्रीचा प्रस्ताव सादर करू शकतो.
जमीन मागणीचा प्रस्ताव: त्याच गावातील भूमिहीन (SC/ST प्रवर्गातील) लाभार्थी जमीन हवी असल्यास मागणीचा अर्ज करू शकतात.
जेव्हा हे दोन्ही प्रस्ताव जिल्हा स्तरावर येतात आणि छाननी होते, तेव्हा शासनाकडून ती जमीन खरेदी करून संबंधित भूमिहीन लाभार्थ्याच्या नावावर करून दिली जाते.
येथे वाचा – फक्त 2500 रुपयांत सोलर बसवा; असा करा अर्ज..
अर्ज कसा आणि कुठे करायचा?
गेल्या १५ दिवसांपासून राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये यासाठी प्रस्ताव मागवले जात आहेत. तुम्हाला या सुवर्णसंधीचा लाभ घ्यायचा असेल, तर खालील गोष्टी करा:
तुमच्या जिल्हा समाज कल्याण कार्यालयात किंवा संबंधित विभागाकडे चौकशी करा.
प्रस्ताव नमुना: जमीन विक्री करणाऱ्याने आणि जमीन हवी असणाऱ्याने विहित नमुन्यात अर्ज भरणे आवश्यक आहे.
ही माहिती फक्त तुमच्यापुरती मर्यादित ठेवू नका. आपल्या आजूबाजूला असे अनेक भूमिहीन बांधव असतील ज्यांना या योजनेची नितांत गरज आहे. ही पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा