Harvester subsidy : शेतकरी मित्रांनो, सध्याच्या काळात शेतीमध्ये मजुरांची कमतरता आणि वेळेचे महत्त्व पाहता यांत्रिकीकरण काळाची गरज बनली आहे. पिकाची कापणी वेळेवर झाली नाही तर हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती असते. पण आता काळजी नको! आज आपण भारतात आलेल्या एका अशा अत्याधुनिक ‘क्रॉप हार्वेस्टर’ बद्दल जाणून घेणार आहोत, जो केवळ तुमचे कामच सोपे करणार नाही, तर पिकाची नासाडी सुद्धा वाचवणार आहे.
हा भारतातील सर्वात लेटेस्ट टेक्नॉलॉजीने सज्ज असलेला हार्वेस्टर आहे. यामध्ये तब्बल १३० एचपी (130 HP) क्षमतेचे ताकदवान इंजिन असून संपूर्ण सिस्टम ऑटोमॅटिक आहे. याचे १४ फुटांचे कटरबार आणि ५१ इंचाची मटेरियल डिस्चार्ज यंत्रणा याला इतर मशीन्सपेक्षा वेगळे ठरवते. मशीनमध्ये धान्य भरले की किंवा मागे काही अडचण असल्यास, याचे सेन्सर्स चालकाला लगेच ‘इंडिकेट’ करतात, ज्यामुळे काम करणे अत्यंत सुरक्षित आणि सोपे होते.
येथे वाचा – या दिवशी गारपीट आणि अवकाळी पाऊस; पंजाब डख यांचा 2026 चा मोठा अंदाज..
कमी नुकसान.. जास्त नफा
या हार्वेस्टरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची अष्टपैलू कामगिरी. तुम्ही याद्वारे तांदूळ, गहू, सोयाबीन आणि तूर अशा सर्व प्रकारच्या पिकांची कापणी करू शकता. विशेष म्हणजे, यातून निघणारे धान्य इतके स्वच्छ असते की, तुम्ही ते थेट घरी नेऊन वापरू शकता किंवा बाजारात विक्रीसाठी पाठवू शकता. साधारणपणे हार्वेस्टरने कापणी करताना ५ ते ६ टक्के पिकाचे नुकसान (Crop Loss) होते, पण या अत्याधुनिक मशीनमुळे हे नुकसान फक्त २ ते ३ टक्क्यांपर्यंत खाली येते, म्हणजेच शेतकऱ्याचा थेट फायदा..
येथे वाचा – कांद्याला हेच खत वापरा आणि भरघोस उत्पादन मिळवा.. पहा उन्हाळी कांदा खत व्यवस्थापन..!
या हार्वेस्टर ची किंमत किती?
आता याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले, तर हे मशीन साधारण २७ लाख ५० हजार रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. ही किंमत मोठी वाटत असली तरी, केंद्र सरकारकडून अशा आधुनिक कृषी यंत्रांवर ८ लाखांपर्यंत अनुदान (Subsidy) मिळण्याची शक्यता आहे. कमीत कमी वेळेत, कमी नासाडीसह स्वच्छ धान्य हवे असल्यास हा हार्वेस्टर शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर सौदा ठरू शकतो.