Gahu Crop Master Dose : शेतकरी मित्रांनो, सध्या सगळीकडे गव्हाचे रान दिसत आहे. कांद्याच्या पिकाने यंदा अनेकांची निराशा केली, त्यामुळे बहुतांश शेतकरी बांधव मोठ्या आशेने गव्हाच्या पिकाकडे वळले आहेत. सध्या गव्हाच्या शेतात खुरपणी किंवा तणनाशक फवारणीची लगबग सुरू असेल. पण, या टप्प्यावर अनेकांना एक महत्त्वाचा प्रश्न पडतो – “आता पाण्यासोबत नेमकं कोणतं खत द्यावं म्हणजे गव्हाला जबरदस्त फुटवे येतील आणि उत्पादन वाढेल?”
जर तुम्हीही फक्त युरिया मारून मोकळे होत असाल, तर थांबा! ही चूक तुम्हाला महागात पडू शकते. आज आपण गव्हाच्या जोमदार वाढीसाठी आणि विक्रमी उत्पादनासाठी एक ‘मास्टर डोस’ पाहणार आहोत.
फक्त युरियाचा अतिवापर टाळा!
बऱ्याचदा आपण गव्हाची वाढ लवकर व्हावी म्हणून फक्त युरियाचा वापर करतो. पण, यामुळे गव्हाची फक्त उंची वाढते (Vegetative Growth). पिक नुसतं वर वाढतं, पण त्याचे खोड कमकुवत राहतं. अशा वेळी जर वारं सुटलं किंवा पाणी जास्त झालं, तर गहू कोलमडून पडण्याची भीती असते. आपल्याला फक्त गवत वाढवायचं नाहीये, तर त्यातून दाणेही मिळवायचे आहेत!
येथे वाचा – तुरीच्या दरात मोठे बदल.. पहा तुमच्या बाजारातील तुरीचे भाव
गव्हासाठी ‘रामबाण’ खत डोस (प्रति एकर प्रमाण)
गव्हाला भरपूर फुटवे फुटण्यासाठी आणि भविष्यात ओंबी मोठी होण्यासाठी, खुरपणीनंतर किंवा तणनाशक मारल्यानंतर जे पाणी देणार आहात, त्याआधी खालील कॉम्बिनेशन नक्की वापरा:
युरिया: १ गोणी (बॅग)
१०:२६:२६: १ गोणी (बॅग)
झिंक सल्फेट: २५ किलो
हेच कॉम्बिनेशन का? यामागील गणित समजून घ्या:
१०:२६:२६ चा फायदा: यामध्ये नायट्रोजनसोबतच २६% फॉस्फरस आणि २६% पोटॅश असते. फॉस्फरसमुळे मुळांची वाढ होऊन गव्हाला जास्तीत जास्त फुटवे (Tillers) फुटतात. तर पोटॅशमुळे गव्हाची ओंबी (Earhead) लांब आणि भरीव होण्यास मदत होते.
झिंक सल्फेटची जादू: झिंकमुळे पिकाला गडद हिरवा रंग (काळोखी) येतो. तसेच सल्फरमुळे पिकात काटकपणा येतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे तांबेरा किंवा मावा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
येथे वाचा – शेतकऱ्यांसाठी मोठा धमाका! आता KCC वर 5 लाखांचे कर्ज.. जाणून घ्या कधीपासून व कसे मिळणार?
पाणी नियोजनाची ‘ही’ ट्रिक वापरा
खते देण्यापूर्वी एक छोटी पण महत्त्वाची टीप: खुरपणीनंतर पिकाला पाण्याचा थोडा ‘तान’ द्या (म्हणजेच जमीन थोडी सुकली पाहिजे). यामुळे पिकाची भूक आणि तहान वाढते. अशा वेळी जेव्हा तुम्ही वर दिलेला खताचा डोस टाकून पाणी द्याल, तेव्हा पीक ते खत भरभरून शोषून घेईल आणि त्याचा रिजल्ट तुम्हाला काही दिवसांतच दिसेल.
(टीप: तान द्यायचा म्हणजे पिक पूर्ण सुकवायचे नाही, फक्त जमिनीला थोडी ओढ लागली पाहिजे.)
येथे वाचा – तुरीच्या दरात मोठे बदल.. पहा तुमच्या बाजारातील तुरीचे भाव
मित्रांनो, गव्हाची शेती हे गणितासारखे आहे. एका बियापासून अनेक फुटवे, अनेक फुटव्यांपासून अनेक ओंब्या आणि प्रत्येक ओंबीत टपोरे दाणे – हे समीकरण जुळले तरच उत्पादन वाढणार आहे. त्यामुळे फक्त युरियाच्या मागे न लागता, वरील संतुलित खतांचा डोस नक्की वापरून पहा.
येथे वाचा – शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कर्जमाफी निधी मंजूर.. येथे पहा शासनाचा GR