शेतकरी सध्या ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहेत, ती घटिका आता समीप आली आहे. पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सरकार शेतकऱ्यांना ‘दुहेरी दिलासा’ देण्याच्या तयारीत आहे. नक्की कधी आणि किती पैसे मिळणार? जाणून घेण्यासाठी हे सविस्तर वाचा..
नमस्कार शेतकरी बांधवांनो, सध्या बळीराजाची नजर आपल्या हक्काच्या पैशांकडे, म्हणजेच ‘पीएम किसान सन्मान निधी’ आणि राज्याच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या हप्त्याकडे लागली आहे. जर तुम्हीही या प्रतीक्षेत असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे.
शेतकऱ्यांना मिळणार ‘दुहेरी’ लाभ
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांची आर्थिक चिंता काही प्रमाणात दूर होणार आहे. कारण, पीएम किसान योजनेचे २००० रुपये आणि राज्य सरकारचे नमो शेतकरी योजनेचे २००० रुपये, असे एकूण ४००० रुपये लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे.
येथे वाचा – या पाच जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळणार.. पहा कसं असेल पुढील हवामान
पैसे नक्की कधी येणार?
राज्यात आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. ५ फेब्रुवारीला निवडणूक होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आचारसंहिता किंवा निवडणुकीच्या धामधुमीपूर्वीच सरकार शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी हे हप्ते वितरीत करू शकते. म्हणजेच, पुढच्या अवघ्या १० दिवसांच्या आत तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज खणखणू शकतो!
साधारणपणे, केंद्र सरकारचा हप्ता जमा झाल्यानंतर आठवडाभरात राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होतो. मात्र, यावेळी दोन्ही हप्ते जवळपास एकाच वेळी मिळण्याचे संकेत आहेत, ज्यामुळे फेब्रुवारी महिना शेतकऱ्यांसाठी ‘बोनस’ महिना ठरू शकतो.
येथे वाचा – रेशनसाठी नवा नियम लागू; आता ‘या’ लोकांचं रेशन थेट बंद
९४ लाख शेतकऱ्यांना होणार फायदा
या निर्णयाचा फायदा राज्यातील जवळपास ९० ते ९४ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आगामी हप्ता एकाच वेळी मिळाल्यास खरिपाच्या तयारीसाठी किंवा इतर शेतीकामांसाठी शेतकऱ्यांना मोठी मदत मिळेल. शेतकरी मित्रांनो, आपले बँक खाते आणि आधार लिंक असल्याची खात्री करून घ्या, कारण ‘गुड न्यूज’ कधीही येऊ शकते!