शेतकरी कर्जमाफी.. आजचं हे काम करा; अन्यथा कर्जमाफी विसरा..

Farmer Loan Waiver : शेतकरी राजासाठी एक आशेचा किरण! कर्जमाफीची चर्चा आता अंतिम टप्प्यात असून शासन आणि बँकांच्या हालचालींना वेग आला आहे. पण नुसती घोषणा होऊन चालणार नाही, तर शेतकऱ्यांनाही आता एक महत्त्वाचे पाऊल तातडीने उचलावे लागणार आहे. जुन्या चुका टाळण्यासाठी आणि कर्जमाफीच्या यादीत आपले नाव नक्की करण्यासाठी काय तयारी करावी? वाचा सविस्तर आणि आजच सावध व्हा!

गेल्या अनेक दिवसांपासून ज्या गोष्टीकडे अवघ्या बळीराजाचे लक्ष लागून राहिले होते, ती म्हणजे ‘शेतकरी कर्जमाफी’. ही कर्जमाफी होणार की नाही, या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची चिन्हे आहेत. कर्जमाफी होणार हे आता जवळपास निश्चित मानले जात आहे. पण मित्रांनो, शासन निर्णय घेईल तेव्हा घेईल, तत्पूर्वी तुम्ही एक जागरूक शेतकरी म्हणून आजच काही गोष्टींची तयारी करणे अत्यंत गरजेचे आहे. आजच्या या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की, सध्या बँकांमध्ये नक्की काय हालचाली सुरू आहेत आणि तुम्हाला तातडीने काय करावे लागेल.

कर्जमाफी नक्की कोणाची?

सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे – कर्जमाफी फक्त थकबाकीदारांची होणार की ज्यांचे कर्ज चालू आहे (नियमित) त्यांनाही लाभ मिळणार? तसेच, ही माफी कोणत्या वर्षापर्यंतच्या कर्जाला लागू होईल?

याबाबत शासनाने अजूनही कोणतेही अधिकृत परिपत्रक (GR) काढलेले नाही. शेतकरी संघटनांनी मागणी केली आहे की, २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही यात सामावून घ्यावे, मग त्यांचे कर्ज मार्चनंतर थकीत का होईना. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक संकेत दिले असले तरी, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात उच्चस्तरीय समितीचा अहवाल आल्यावरच चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल.

येथे वाचा – कांदा पिकाला देशी दारूचा डोस; जबरदस्त रिझल्ट.. फक्त अशी करा फवारणी..

बँका कामाला लागल्या

शासनाचा निर्णय यायचा बाकी असला तरी, ‘सहकारी बँका’ आणि ‘सोसायट्या’ यांना मात्र तयारीचे आदेश मिळाले आहेत. तुमच्या सोसायटीमध्ये सध्या माहिती संकलनाचे (Data Collection) काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

उद्या जेव्हा कर्जमाफी जाहीर होईल, तेव्हा ऐनवेळी तुमची धावपळ होऊ नये म्हणून बँका आताच सर्व माहिती गोळा करत आहेत. त्यामुळे “अजून जीआर आला नाही, मग आताच कशाला कागदपत्रे द्यायची?” असा विचार करून शांत बसू नका.

येथे वाचा – शेळीपालनासाठी चक्क 75% अनुदान.. ‘पोकरा’ योजना.. मोबाईलवरून असा भरा अर्ज..

तुम्हाला काय करायचे आहे?

तुम्ही जर सोसायटीचे कर्जदार असाल (थकीत असो किंवा चालू), तर त्वरित आपल्या सोसायटी सचिवांशी संपर्क साधा. सध्या खालील माहिती आणि कागदपत्रे प्रामुख्याने मागितली जात आहेत:
आधार कार्ड आणि मोबाईल नंबर: तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे.
फार्मर आयडी (Farmer ID): आता सातबारा आणि ८-अ पेक्षाही ‘फार्मर आयडी’ला महत्त्व आले आहे. या आयडीद्वारे तुमची सर्व माहिती शासनाकडे जाणार आहे.
जमिनीची कागदपत्रे: तरीही सुरक्षितता म्हणून तुमचा ८-अ आणि सातबारा उतारा तयार ठेवा.
बँक पासबुक: तुमच्या सेव्हिंग खात्याची (बचत खाते) माहिती अपडेटेड ठेवा.

येथे वाचा –एक फवारणी आणि 6 महिने गवताची सुट्टी.. तणांचा दुश्मन तणनाशक.. पहा कोणी वापरावे?

मयत शेतकऱ्यांच्या वारसांनी घ्यायची विशेष काळजी

मित्रांनो, २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीमध्ये अनेक शेतकरी केवळ कागदपत्रांअभावी लाभापासून वंचित राहिले होते. विशेषतः ज्या मूळ कर्जदार शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या वारसांना अनेक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे, जर कर्जदार शेतकरी हयात नसेल, तर त्यांच्या वारसांनी वारस प्रमाणपत्र (Succession Certificate) आणि इतर कायदेशीर कागदपत्रे आताच सोसायटीला जमा करा. ऐनवेळी हे कागद काढायला खूप वेळ जातो आणि नाहक मनस्ताप होतो.

सध्या फक्त सहकारी बँकांसाठी हालचाली

एक गोष्ट लक्षात ठेवा, सध्या जी माहिती गोळा केली जात आहे, ती प्रामुख्याने सहकारी बँका आणि सोसायट्यांसाठी आहे. राष्ट्रीयकृत (Nationalized) किंवा खाजगी बँकांच्या कर्जदारांबाबत अजून स्पष्ट सूचना आलेल्या नाहीत. पण तुम्ही सोसायटीचे सभासद असाल, तर मात्र अजिबात गाफील राहू नका.

थोडक्यात सांगायचे तर.. कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल, तर आपली ‘फाईल’ क्लिअर ठेवा. सोसायटीने मागितलेली कागदपत्रे विनाविलंब जमा करा. कारण तयारी असेल तरच लाभाची खात्री देता येईल!

Leave a Comment

Join WhatsApp Group