शेत रस्ता 100% होणार.. तहसीलदार 7 दिवसांत रस्ता मोकळा करणार.. पहा नवीन नियम

Shet Rasta Niyam 2026 : शेतकरी मित्रांनो, आपण रात्रंदिवस शेतात राबतो, पण पिकाला पाणी द्यायला किंवा माल घरी आणायला जर नीट रस्ताच नसेल, तर त्या कष्टाचं सोनं कसं होणार? “अमक्याने रस्ता अडवला”, “तमक्याने बांध कोरला” या भांडणात शेतकऱ्याची अर्धी हयात जाते. पण आता चिंता सोडा! शासनाने शेत रस्त्यांबाबतचे नियम आता अधिक कडक आणि शेतकऱ्यांच्या फायद्याचे केले आहेत. तुम्ही जर शेत रस्त्याच्या समस्येने त्रस्त असाल, तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. आता कुणीही तुमचा रस्ता अडवू शकणार नाही आणि रस्ता तयार करण्यासाठी खिशातून पैसेही खर्च करावे लागणार नाहीत. चला तर मग जाणून घेऊया, काय आहेत हे नवीन नियम आणि त्याचा फायदा कसा घ्यायचा?

आता “लोकवर्गणी” नाही, तर “सरकारी निधी” मिळणार!

पूर्वी कसं होतं? रस्ता करायचा म्हटलं की मनरेगा (MNREGA) मधून माणसं लावावी लागायची किंवा गावकऱ्यांनी वर्गणी गोळा करायची. पण आता हे चित्र बदललं आहे.
नवीन नियमांनुसार, शेत रस्ता तयार करण्यासाठी शासन थेट पैसे देणार आहे.
आता तुम्ही आमदार निधी, खासदार निधी, जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायतचा १५ वा वित्त आयोग अशा विविध माध्यमातून निधी मिळवू शकता.
महत्वाचे म्हणजे, आता माणसांकडून काम करून घेण्याची सक्ती नाही. तुम्ही जेसीबी (JCB) किंवा पोकलेन मशीन लावून झटपट रस्ता तयार करून घेऊ शकता.

येथे वाचा – खुशखबर! ‘या’ तारखेला महिलांच्या खात्यात 3 हजार जमा होणार.. पहा महत्वाची तारीख

शेत रस्ता अडवलाय? आता तहसीलदार ७ दिवसांत रस्ता मोकळा करणार

बऱ्याचदा शेजारील शेतकरी बांधावरचे वाद किंवा कमी जमिनीमुळे रस्ता अडवून धरतात. अशा वेळी काय करायचं? तुम्हाला फक्त तहसीलदारांकडे अर्ज करायचा आहे. आता विधानसभेच्या स्तरावर खास समित्या नेमल्या आहेत, ज्याचे अध्यक्ष स्वतः आमदार असतात. त्यामुळे कामाला गती मिळणार आहे. जर रस्ता नकाशावर असेल आणि कुणी अडवला असेल, तर तो ७ दिवसांच्या आत मोकळा करून देण्याची जबाबदारी आता प्रशासनाची आहे.

मोजणी आणि संरक्षणासाठी एक रुपयाही लागणार नाही

ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे.
तहसीलदारांनी आदेश दिल्यावर भूमिअभिलेख विभागामार्फत रस्त्याची हद्द मोजून दिली जाईल. यासाठी तुम्हाला मोजणी फी देण्याची गरज नाही.
जर रस्ता मोकळा करताना कुणी अंगावर येत असेल किंवा भांडण करत असेल, तर पोलीस संरक्षण मोफत मिळणार आहे. तसेच, रस्त्यासाठी लागणारे मुरूम, दगड किंवा माती भरण्यासाठी कोणतीही रॉयल्टी (Royalty) भरावी लागणार नाही.

येथे वाचा – अतिवृष्टी भरपाई वाटप यादी जाहीर.. या जिल्ह्याची यादी प्रसिद्ध.. येथे डाउनलोड करा यादी

बागायती शेतीचं स्वप्न आता पूर्ण होणार

जोपर्यंत शेतात ट्रक, ट्रॅक्टर किंवा टेम्पो जात नाही, तोपर्यंत आपण ऊस, केळी, पपई किंवा इतर फळबागांची लागवड करू शकत नाही. सोयाबीन-कापसाच्या पलीकडे जाऊन जर आपल्याला “कॅश क्रॉप” (नगदी पीक) घ्यायचे असतील, तर पक्का रस्ता हवाच. आता या नवीन योजनेमुळे तुम्ही तुमच्या शेतात हवं ते पीक घेऊ शकाल आणि थेट मार्केटपर्यंत पोहोचवू शकाल.

येथे वाचा – पीक विम्याचे 50 हजार मिळणार? पहा तुम्हाला मिळणार का?

आता तुमची पाळी

मित्रांनो, रब्बीची पिके निघाल्यावर आणि पावसाळा सुरू होण्याआधी, म्हणजेच या उन्हाळ्यातच ही कामे उरकून घेणे शहाणपणाचे ठरेल. उगीच भांडत बसण्यापेक्षा कायद्याने आणि हक्काने आपला रस्ता मोकळा करून घ्या.

Leave a Comment

Join WhatsApp Group