Crop Loan Limit Increase : शेतकरी बंधूंनो, महागाईच्या या काळात शेती करणं दिवसेंदिवस खर्चीक होत चाललं आहे. खतं, बियाणं आणि मजुरीचे वाढलेले दर यामुळे नियोजनाचं गणित अनेकदा कोलमडतं. पण, आता तुमच्यासाठी एक मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.. राष्ट्रीयीकृत बँकांनी या वर्षीच्या पीक कर्जाच्या मर्यादेत (Scale of Finance) घसघशीत वाढ केली आहे. याचा थेट फायदा तुम्हाला येत्या खरीप आणि रब्बी हंगामात होणार आहे. तुमच्या खिशाल मोठा आधार मिळावा म्हणून जिल्हास्तरीय समितीने पीक कर्जाचे हे नवीन दर निश्चित केले आहेत.
नेमकी किती वाढ झाली आहे?
पूर्वीच्या तुलनेत आता तुम्हाला हेक्टरी किती जास्त कर्ज मिळणार, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. ही आकडेवारी पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की आता शेतीसाठी भांडवल उभं करणं थोडं सोपं होणार आहे.
येथे वाचा – शेतकरी कर्जमाफी.. आजचं हे काम करा; अन्यथा कर्जमाफी विसरा..
पिकनिहाय नवीन कर्ज मर्यादा (प्रति हेक्टर)
कापूस (Cotton): कापूस उत्पादकांसाठी मोठी खुशखबर आहे. कापसासाठीची कर्ज मर्यादा आता ८५,००० रुपये करण्यात आली आहे. (पूर्वी ही ६५,००० रुपये होती).
सोयाबीन (Soybean): सोयाबीन हे आपल्याकडील प्रमुख पीक. यासाठी आता हेक्टरी ७५,००० रुपये कर्ज मिळेल. (पूर्वी ५८,००० रुपये मिळत होते).
ऊस (Sugarcane): ऊस उत्पादकांसाठी कर्जाची रक्कम १,६५,००० रुपयांवरून वाढवून आता १,८०,००० रुपये करण्यात आली आहे.
तूर (Tur): तुरीसाठीची मर्यादा ५२,००० रुपयांवरून वाढवून ६५,००० रुपये झाली आहे.
हरभरा (Gram): रब्बी हंगामातील महत्त्वाचं पीक असलेल्या हरभऱ्यासाठी आता ६०,००० रुपये कर्ज मिळेल. (जुनी मर्यादा ४५,००० रुपये होती).
रब्बी ज्वारी (Jowar): ज्वारीसाठी ३६,००० रुपयांवरून थेट ५४,००० रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे.
मूग (Moong): मुगासाठीची मर्यादा २८,००० रुपयांवरून वाढवून ३२,००० रुपये करण्यात आली आहे.
येथे वाचा – शेतकरी कर्जमाफी.. आजचं हे काम करा; अन्यथा कर्जमाफी विसरा..
शेतकऱ्यांसाठी याचा काय फायदा होईल?
ही वाढ केवळ कागदावर नसून, प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या गरजांचा विचार करून करण्यात आली आहे. वाढीव कर्जामुळे तुम्हाला उत्तम दर्जाची बियाणे, वेळेवर खते आणि कीटकनाशके खरेदी करणे सोपे जाईल. पैशाअभावी पिकांकडे दुर्लक्ष होणार नाही आणि पर्यायाने उत्पादनातही वाढ होण्यास मदत होईल.
पुढचं पाऊल काय?
मित्रांनो, या नवीन दरांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेशी किंवा विकास सोसायटीशी संपर्क साधा. नवीन हंगामाची तयारी करताना या वाढीव भांडवलाचा नक्कीच चांगला उपयोग करून घ्या.