घरूनच तपासा पिक विम्याचे स्टेटस.. पहा तुमचा अर्ज मंजूर झाला की रिजेक्ट?

Crop Insurance Status : शेतकरी मित्रांनो, सध्या राज्यभरात जिथे तिथे एकच चर्चा ऐकायला मिळतेय – “यंदाचा खरीप हंगाम २०२५ चा पीक विमा कधी मिळणार?” मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी १७,००० रुपयांची घोषणा केली आणि केंद्रीय मंत्र्यांनी उशीरा पैसे मिळाल्यास व्याजासहित रक्कम देण्याचे आश्वासन दिले. पण जमिनीवरची परिस्थिती वेगळीच आहे; तारखा उलटून गेल्या तरी शेतकऱ्यांच्या हाती अजून दमडीही पडलेली नाही. पण मित्रांनो, पैशांच्या वाटेकडे डोळे लावून बसण्याआधी तुम्ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट तपासली आहे का? तुमचा पीक विम्याचा अर्ज खरंच मंजूर (Approved) झाला आहे का?

धक्कादायक बाब अशी आहे की, अजूनही अनेक विमा कंपन्यांनी लाखो शेतकऱ्यांच्या अर्जांचे साधे व्हेरिफिकेशन सुद्धा पूर्ण केलेले नाही. त्यामुळे पैसे येणे तर दूरच, पण तुमचा अर्जच जर त्रुटींमुळे अडकला असेल, तर वाट बघून काहीही उपयोग होणार नाही.
आजच्या या ब्लॉगमध्ये आपण बघूया की, घरबसल्या मोबाईलवर अवघ्या २ मिनिटांत पीक विम्याचे स्टेटस कसे तपासायचे आणि ‘Pending’ किंवा ‘Revert’ दिसत असेल तर काय करायचे?

मोबाईलवर स्टेटस कसे तपासायचे?

तुमचा अर्ज मंजूर झाल्याशिवाय विम्याची रक्कम मिळणे अशक्य आहे. त्यामुळे खालील पायऱ्या वापरून आजच खात्री करा:
१. वेबसाईटवर जा: तुमच्या मोबाईलमध्ये Google ओपन करा आणि तिथे ‘PMFBY’ असे सर्च करा.
२. पहिल्या लिंकवर क्लिक करा: pmfby.gov.in ही अधिकृत वेबसाईट तुमच्या समोर येईल, ती ओपन करा.
३. Status चेक करा: वेबसाईटवर तुम्हाला ‘Application Status’ नावाचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
४. पॉलिसी नंबर टाका: पीक विमा भरताना तुम्हाला जी पावती मिळाली होती, त्यावर तुमचा ‘Application/Policy Number’ असतो. तो जसाच्या तसा तिथे टाका. (टीप: नंबरच्या शेवटी जर डॅश किंवा ०१, ०२ असे अंक असतील तर ते वगळून मुख्य नंबरच टाकावा.)
५. कॅप्चा भरा: तिथे दिसणारे अक्षरे/अंक जसेच्या तसे खालील बॉक्समध्ये लिहा आणि ‘Check Status’ बटनावर क्लिक करा.

येथे वाचा – खरीप पीक विम्याचे पैसे कधी येणार? हेक्टरी १७,००० मिळणार का? पहा आता काय करावे?

स्टेटसचा अर्थ समजून घ्या (सर्वात महत्त्वाचे)

आता स्क्रीनवर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती दिसेल. तिथे दिसणाऱ्या शब्दांचा अर्थ काय आहे, हे खालीलप्रमाणे नीट समजून घ्या:
Revert (रिव्हर्ट): हे धोक्याचे लक्षण आहे! याचा अर्थ तुमच्या अर्जात किंवा कागदपत्रांमध्ये काहीतरी चूक/त्रुटी आहे. विमा कंपनीने तुमची कागदपत्रे पुन्हा मागवली आहेत.
उपाय: ताबडतोब ज्या सीएससी (CSC) सेंटरवरून किंवा दुकानातून तुम्ही फॉर्म भरला होता, तिथे जा आणि योग्य कागदपत्रे पुन्हा अपलोड करा. हे नाही केले तर विमा मिळणार नाही.
Verification Pending (व्हेरिफिकेशन पेंडिंग): याचा अर्थ तुम्ही फॉर्म भरलाय, पैसे कट झालेत, पण विमा कंपनीने अजून तुमचा अर्ज उघडूनही बघितलेला नाही. तुमचे काम अजून मधल्यामध्ये लटकले आहे. जोपर्यंत हे पूर्ण होत नाही, तोपर्यंत पैसे मिळणे कठीण आहे.
Rejected (रिजेक्टेड): ही सर्वात वाईट बातमी असू शकते. याचा अर्थ विमा कंपनीने तुमचा अर्ज बाद केला आहे.
उपाय: जर तुमची सर्व कागदपत्रे बरोबर असूनही अर्ज रिजेक्ट झाला असेल, तर पुराव्यासह तालुका कृषी कार्यालयात जाऊन लेखी तक्रार नोंदवा.
Approved (अप्रूव्हड): तिथे ‘Approved’ किंवा ‘मंजूर’ दिसत असेल, तर अभिनंदन! तुम्ही सेफ झोनमध्ये आहात. तुमचे कागदपत्र बरोबर आहेत आणि तुमचा अर्ज स्वीकारला गेला आहे. आता फक्त रक्कम जमा होण्याची वाट बघायची आहे.

येथे वाचा – दुष्काळ की अवकाळी पाऊस? पहा 2026 चा पंजाब डख यांचा खरा हवामान अंदाज

थोडक्यात सांगायचे तर.. विम्याच्या रकमेचे गणित नंतर जुळवले जाईल, आधी तुमचा अर्ज मंजूर होणे गरजेचे आहे. सध्या विमा कंपन्यांचे काम खूप संथ गतीने चालू आहे, त्यामुळे कोणाच्याही सांगण्यावर विसंबून राहू नका. स्वतःच्या मोबाईलचा वापर करा आणि आजच स्टेटस तपासा. जर काही चूक असेल तर ती वेळीच दुरुस्त करा, नाहीतर हातात आलेला घास तोंडाशी येणार नाही.

Leave a Comment

Join WhatsApp Group