शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीकविमा भरपाई थेट खात्यात जमा.. या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा..

Crop Insurance Compensation : पीकविम्याची भरपाई अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात; तब्बल २९७ कोटींचा निधी वाटप… पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत २०२४ च्या खरीप आणि रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मंजूर झालेली भरपाई सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे. एकूण २९७ कोटी ५० लाख रुपये इतका मोठा निधी पात्र लाभार्थ्यांना वितरित झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर पीकविमा घेतला होता. खरीप हंगामात ३ लाख १२ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारीसाठी तर रब्बीत १ लाख ६ हजार हेक्टरवर हरभरा, गहू व ज्वारी पिकांसाठी विमा संरक्षण नोंदवण्यात आले होते. या दोन हंगामांतील स्थानिक नैसर्गिक आपत्तींशी संबंधित एकूण ४ लाख ५४ हजारांहून अधिक तक्रारी शेतकऱ्यांनी नोंदवल्या.

येथे वाचा – सोयाबीनच्या दरात या ठिकाणी वाढ; मिळतोय काल पेक्षा जास्त दर..

एचडीएफसी ईआरजीओ कंपनीने या दाव्यांवर कार्यवाही करत खरीप २०२४ साठी १९५ कोटी ४५ लाख, तर रब्बीसाठी १०२ कोटी ३ लाख इतकी रक्कम मंजूर करून शेतकऱ्यांना दिली असून यातून एकूण २९७ कोटी ५० लाखांचा निधी वितरित झाला आहे.

१ कोटीहून अधिक रक्कम अजूनही अडकून

दरम्यान, काही तांत्रिक अडथळ्यांमुळे १ कोटी ३७ लाख रुपयांहून अधिक पीकविमा रक्कम अद्याप वितरित होऊ शकलेली नाही. यामध्ये १,००० रुपयांपेक्षा कमी असलेले दावे, अपूर्ण KYC, बंद बँक खाते अशा कारणांचा समावेश आहे.

येथे वाचा – गव्हाचे दुप्पट उत्पादन; फक्त ही ट्रिक वापरा

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी विमा कंपनीला निर्देश दिले आहेत की, संबंधित लाभार्थ्यांशी त्वरित संपर्क करून त्यांची KYC व बँक माहिती अद्ययावत करून घ्यावी. “उर्वरित रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल,” अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी दिली.

Leave a Comment

Join WhatsApp Group