गाय-म्हशी घ्या स्वस्तात; तब्बल 50% अनुदान, असा करा अर्ज..

Farmer Subsidy Scheme : दुग्धव्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे, पण भांडवलाअभावी अडचण येत असेल, तर शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारकडून दुधाळ गाय-म्हशीच्या खरेदीसाठी थेट ५० टक्के अनुदान दिले जाणार असून, त्यासोबतच कडबा-कुट्टी मशीन आणि चाऱ्यासाठीही आर्थिक मदत मिळणार आहे. ही योजना विदर्भ व मराठवाड्यातील एकूण १९ जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे.

महाराष्ट्र शासनाने सन २०२४-२५ ते २०२७-२८ या कालावधीसाठी ‘विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प (टप्पा २)’ अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पात जालना जिल्ह्याचाही समावेश असून, ग्रामीण भागातील पशुपालकांचे उत्पन्न वाढावे आणि दुग्धव्यवसायाला चालना मिळावी, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

येथे वाचा – आता ई-पीक पाहणी करा नवीन पद्धतीने, मोबाईलची गरज नाही.. पहा फायद्याची बातमी..

या प्रकल्पांतर्गत लाभार्थ्यांना विविध स्वरूपात अनुदान दिले जाणार आहे. उच्च दूध उत्पादन क्षमतेची एक दुधाळ गाय किंवा म्हैस खरेदीसाठी ५० टक्के अनुदान मिळेल. तसेच ७५ टक्के अनुदानावर भ्रूण प्रत्यारोपण केलेली सात महिन्यांची गाभण कालवड दिली जाणार आहे. याशिवाय प्रजनन पूरक खाद्य व फॅट-एसएनएफ वाढीसाठीच्या खाद्यावर २५ टक्के अनुदान, कडबा-कुट्टी यंत्रासाठी ५० टक्के अनुदान, मुरघासासाठी २५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, सावर बहुवार्षिक चारा पिकांच्या बियाणे किंवा ठोंब्यांसाठी १०० टक्के अनुदान दिले जाणार आहे.

या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पशुपालकांनी www.vmddp.com या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग, जालना यांनी केले आहे.

येथे वाचा – राज्यात अवकाळीची शक्यता आहे का? पहा पंजाब डख यांचा डिसेंबरचा हवामान अंदाज..

योजनेसंदर्भातील अधिक माहितीसाठी विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प (टप्पा २) चे जिल्हा प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल जाधव, जालना यांच्याशी ९६०५४५१८५० या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

Leave a Comment

Join WhatsApp Group