Cidco Housing Lottery : नमस्कार मित्रांनो! सध्या सर्वत्र सिडकोच्या (CIDCO) १९,००० घरांच्या आणि खाजगी बिल्डर्सच्या ६१ घरांच्या लॉटरीची जबरदस्त चर्चा सुरू आहे. तुमच्यापैकी अनेकांचे स्वप्न असेल की, नवी मुंबईत हक्काचे घर असावे. पण, हे स्वप्न पूर्ण करण्याच्या वाटेवर एक प्रश्न अनेकांना सतावतोय, तो म्हणजे – “मी अर्ज नक्की कोणत्या गटातून करू? EWS की LIG? जर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. चला, आजच्या या ब्लॉगमध्ये आपण तुमचा हा गोंधळ कायमचा दूर करूया आणि नक्की फायदा कशात आहे ते समजून घेऊया.
उत्पन्नाचा निकष (Income Criteria) हाच मुख्य आधार
सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करा, अर्ज EWS (अत्यल्प उत्पन्न गट) मध्ये करायचा की LIG (अल्प उत्पन्न गट) मध्ये, हे पूर्णपणे तुमच्या वार्षिक उत्पन्नावर अवलंबून आहे.
EWS (Economically Weaker Section): जर तुमचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ६ लाखांपेक्षा कमी असेल, तर तुम्ही फक्त आणि फक्त EWS गटातूनच अर्ज करू शकता.
LIG (Lower Income Group): जर तुमचे वार्षिक उत्पन्न ६ लाखांपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही LIG गटासाठी पात्र ठरता.
महत्वाचा फरक: म्हाडाच्या लॉटरीमध्ये काही वेळा EWS मधील व्यक्ती LIG मध्ये अर्ज करू शकते, पण सिडको लॉटरीमध्ये हा नियम नाही. येथे नियम कडक आहेत – तुमचे उत्पन्न ज्या गटात बसते, त्याच गटात तुम्हाला अर्ज करावा लागतो. तुम्ही एकाच वेळी दोन्हीकडे अर्ज करू शकत नाही.
येथे वाचा – सिडकोचे घर विकता येते का? भाड्याने देता येते का?
खरा फायदा कुठे आहे? (सबसिडीचे गणित)
आता मुद्द्याच्या गोष्टीकडे वळूया. अर्ज तर उत्पन्नानुसारच करावा लागेल, पण फायदा कशात जास्त आहे? जर तुम्ही EWS गटातून अर्ज करत असाल, तर तुम्हाला सर्वात मोठा दिलासा मिळतो तो म्हणजे PMAY (प्रधानमंत्री आवास योजना) सबसिडीचा!
EWS लाभ: EWS गटातील अर्जदारांना केंद्र सरकारकडून १.५ लाख आणि राज्य सरकारकडून १ लाख, अशी एकूण २.५ लाख रुपयांची सबसिडी मिळू शकते.
LIG तोटा: दुर्दैवाने, LIG गटासाठी ही PMAY सबसिडी लागू नाही. तुम्हाला घराची पूर्ण रक्कम स्वतःच भरावी लागते.
टीप: EWS ची सबसिडी मिळवण्यासाठी तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (उदा. पनवेल महानगरपालिका) PMAY ऑफिसमध्ये जाऊन ऑफलाईन अर्ज भरावा लागतो.
येथे वाचा – तयारीला लागा! मुंबईत मोक्याच्या ठिकाणी म्हाडाची 44 घरे.. पहा ही घरं का आहे खास?
फॉर्म भरताना ही चूक करू नका!
अनेकदा लोक घाईगडबडीत चुकीच्या गटात नोंदणी (Registration) करतात आणि नंतर विचारतात, “सर, आता मी गट बदलू शकतो का? तर याचे उत्तर आहे – नाही! (बहुतेक करून). एकदा का तुम्ही LIG मध्ये नोंदणी केली, तर ती बदलून EWS करणे सिस्टिममध्ये खूप कठीण जाते. त्यामुळे फॉर्म भरतानाच तुमचे उत्पन्नाचे दाखले आणि इतर कागदपत्रे तपासून मगच योग्य गट निवडा.
थोडक्यात सांगायचे तर… सिडको लॉटरी ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. जर तुमचे उत्पन्न ६ लाखांच्या आत असेल, तर EWS हा तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे, कारण तिथे तुम्हाला हक्काच्या घरासोबत अडीच लाखांची मदतही मिळते. जर उत्पन्न जास्त असेल, तर LIG मधून अर्ज करा आणि घराचे स्वप्न पूर्ण करा.
येथे वाचा – सिडकोची आणखी एक लॉटरी जाहीर.. फॉर्म भरणे सुरू.. पहा घरांचे लोकेशन..