Cidco Flats Navi Mumbai : नवी मुंबईत स्वतःचे हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहताय? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे! सिडकोने आपल्या घरांच्या किंमतीत १०% कपात करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. पण, एका बाजूला आनंदाची बातमी असताना, घराचा ताबा (Possession) मिळण्याच्या तारखांमध्ये मोठे बदल झाल्यामुळे काहीशी चिंताही वाढली आहे. नक्की काय आहेत नवीन दर? आणि कुठे वाढलीये प्रतीक्षा? वाचा सिडको लॉटरीची ही संपूर्ण आणि सविस्तर माहिती…
नमस्कार मित्रांनो! सिडकोच्या ‘माझे पसंतीचे घर’ योजनेची सध्या सर्वत्र चर्चा आहे. नुकतीच या योजनेअंतर्गत घरांच्या नवीन किंमती जाहीर झाल्या आहेत आणि घर खरेदी करणाऱ्यांसाठी एक ‘गुड न्यूज’ समोर आली आहे. सिडकोने घरांच्या मूळ किंमतीत थेट १०% कपात केली आहे. यामुळे अनेकसामान्यांचे बजेट थोडे हलके होणार आहे.
पण, थांबा! नाण्याला दुसरी बाजूही आहे. किंमती कमी झाल्या असल्या तरी, काही ठिकाणी घराचा ताबा मिळण्यासाठीची प्रतीक्षा वाढली आहे. चला तर मग, प्रकल्पनिहाय जाणून घेऊया की तुमच्या पसंतीच्या एरियामध्ये नक्की काय परिस्थिती आहे.
पहा लोकेशन नुसार घरांच्या नवीन किमती
१. कामोठे आणि खांदेश्वर: आनंदाची बातमी की प्रतीक्षा?
कामोठे आणि खांदेश्वर हे प्रवासाच्या दृष्टीने अनेकांचे फेव्हरेट लोकेशन्स आहेत. इथे १०% कपातीमुळे किंमती नक्कीच अवाक्यात आल्या आहेत, पण पजेशन डेट मात्र लांबली आहे.
मानसरोवर (कामोठे): इथे घराची किंमत आता ₹३७.७० लाख झाली आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे, आधी २०२२६ मध्ये ताबा मिळणार होता, तो आता थेट २०३० पर्यंत गेला आहे. इथे फक्त २१ सदनिका उपलब्ध आहेत.
खांदेश्वर स्टेशन: येथील घरांची किंमत ४६ लाखांवरून ₹४२ लाखांवर आली आहे. पण इथेही ताबा मिळण्याची तारीख ३१ डिसेंबर २०३० करण्यात आली आहे.
सिडकोचा 2BHK सॅम्पल फ्लॅट
येथे क्लिक करून पहा
२. तळोजा: ‘रेडी टू मूव्ह’ हवं असेल तर बेस्ट ऑप्शन
जर तुम्हाला जास्त वाट बघायची नसेल आणि लगेच राहायला जायचं असेल, तर तळोजा हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
सेक्टर ३७: इथल्या प्रोजेक्टला ‘ओसी’ (OC) मिळाली आहे, म्हणजे घरं राहायला तयार आहेत! १ BHK ची किंमत ३४ लाखांवरून ₹३०.०८ लाखांवर आली आहे. कारपेट एरियाही थोडा मोठा (३९८ चौ.फूट) आहे.
सेक्टर ३९: इथे सर्वात जास्त (४५९९) घरे उपलब्ध आहेत. किंमत ₹२३.५० लाख आहे आणि ताबा डिसेंबर २०२५ पर्यंत मिळेल. महत्त्वाचे म्हणजे, इथे प्रधानमंत्री आवास योजनेचा (PMAY) लाभ मिळाला तर हे घर तुम्हाला २०-२१ लाखांत पडू शकते.
३. पनवेल आणि वाशी: हाय प्रोफाईल लोकेशन्सचे काय?
पनवेल (सेक्टर ८): पनवेलमधील घरांची किंमत ४५ लाखांवरून ₹४०.६० लाखांवर आली आहे. हे दर आकर्षक आहेत, पण इथेही पजेशन डेट २०३० पर्यंत गेली आहे आणि दुर्दैवाने फक्त ६ घरे शिल्लक आहेत.
वाशी: वाशीच्या घरांच्या किंमतीवरून खूप टीका झाली होती. आता ७४ लाखांचे घर ₹६६.७० लाखांना मिळणार आहे. पण इथेही ताबा मिळवण्यासाठी २०३० ची वाट पहावी लागणार आहे.
सिडकोचा 2BHK सॅम्पल फ्लॅट
येथे क्लिक करून पहा
४. खारघर: प्रीमियम लोकेशन, प्रीमियम दर?
खारघरमध्ये दोन महत्त्वाचे बदल आहेत:
रेल्वे स्टेशनजवळ (सेक्टर 1A): इथे २ BHK (LIG-B) घरे आहेत. किंमत ९७ लाखांवरून ₹८५.५० लाख झाली आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे याचा ताबा २०२६ च्या शेवटी मिळणार आहे.
बस डेपो: येथील १ BHK ची किंमत ₹४३.५० लाख झाली असून हा प्रोजेक्ट जवळपास पूर्ण झाला आहे (जून २०२५ ची डेडलाईन होती).
५. उलवे आणि बामणडोंगरी: बजेटमधील हक्काचं घर
बामणडोंगरी (सेक्टर ६): हे देखील ‘रेडी टू मूव्ह’ (OC प्राप्त) आहेत. ३१ लाखांचे घर आता ₹२८.७० लाखांत मिळत आहे. ज्यांना घाई आहे, त्यांच्यासाठी हा ‘सोन्याचा’ पर्याय आहे.
उलवे (जुनी योजना): येथील घरांचा ताबा २०२६ मध्ये मिळेल आणि किंमत ४० लाखांवरून ₹३६.३० लाखांवर आली आहे.
६. नवीन योजना (खारकोपर आणि उलवे)
खारकोपर पूर्व आणि पश्चिममधील नवीन प्रोजेक्ट्सचा ताबा २०२७-२८ मध्ये मिळेल. हे प्रोजेक्ट्स अजून अंडर-कन्स्ट्रक्शन असल्यामुळे यांच्या अंतिम किंमती अजून गुलदस्त्यात आहेत.
सिडकोने १०% दर कपात करून ग्राहकांना मोठी संधी दिली आहे, विशेषतः तळोजा आणि बामणडोंगरी सारख्या ठिकाणी जिथे घरे तयार आहेत. मात्र, कामोठे, पनवेल आणि वाशी सारख्या ठिकाणी जर तुम्ही घर घेणार असाल, तर तुम्हाला २०३० पर्यंत वाट पाहण्याची तयारी ठेवावी लागेल.
येथे वाचा – मुंबईत म्हाडाचे 35 लाखात घर; लॉटरीशिवाय थेट घर.. पहा जाहिरात कधी येणार?
महत्त्वाची टीप: सध्या नोंदणी (Registration) सुरु आहे. घर निवडण्याची प्रक्रिया (Book your home) येत्या काही दिवसांत सुरू होईल. त्यामुळे आपली कागदपत्रे आणि बजेट तयार ठेवा..