माकड पकडा 600 रुपये मिळवा, शासनाची नवीन मोहीम..

राज्यात वाढत्या माकड–मानव संघर्षामुळे शेतातील पिकांचे नुकसान, घरांची तोडफोड आणि नागरिकांवर हल्ल्यांच्या घटनांनी मोठे स्वरूप धारण केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उपद्रवी माकडांना मानवी पद्धतीने पकडून सुरक्षित जंगलात सोडण्याची मोहीम सुरू केली आहे.

प्रशिक्षित माकड पकड पथकांना महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायत यांच्या समन्वयाने काम करण्याची अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. तक्रार आल्यानंतर वनअधिकारी उपद्रवाची तीव्रता, संख्या आणि नुकसानाचा अहवाल तयार करतील, त्यानंतर पथके जाळी व पिंजऱ्यांचा वापर करून माकडांना सुरक्षितरीत्या पकडतील. प्रत्येक पकडीचा फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड तयार केला जाईल.

उपचारानंतर ही माकडे किमान 10 किमी दूरच्या वनक्षेत्रात सोडली जातील. मोहिमेसाठी सरकारने ठरवलेले मानधन पुढीलप्रमाणे आहे—10 माकडांपर्यंत प्रति माकड 600 रुपये, 10 पेक्षा जास्त असल्यास 300 रुपये, एका प्रकरणात कमाल 10,000 रुपये आणि 1–5 माकडांसाठी अतिरिक्त 1,000 रुपये प्रवास खर्च. वाढत्या मनुष्यहानी, घरांचे नुकसान आणि शेतीवरील परिणाम पाहता ही मोहीम अत्यंत गरजेची ठरली आहे.

येथे वाचा – महिलांना 2100 रुपये कधी पासून मिळणार? थेट मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं..!

प्रश्न आणि उत्तरे

उपद्रवी माकड पकडण्याची मोहीम का सुरू करण्यात आली?
राज्यात माकडांमुळे नागरिक जखमी होणे, घरांचे नुकसान व शेती पिके नष्ट होण्याच्या घटना वाढल्यामुळे सरकारने ही मोहीम सुरू केली आहे.

माकड पकडण्याची जबाबदारी कोण घेणार?
प्रशिक्षित माकड पकड पथके महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायत यांच्या समन्वयाने काम करतील.

माकड पकडण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाणार?
जाळी, पिंजरा अशा मानवी आणि सुरक्षित पद्धती वापरून माकडांना पकडले जाईल. पकड प्रक्रियेचा फोटो व व्हिडिओ रेकॉर्डही केला जाईल.

येथे वाचा – गव्हाची उशिरा पेरणी करायची? घाबरू नका! गहू उत्पादन 20% वाढवण्याचा फॉर्म्युला..

पकडलेली माकडे कुठे सोडली जातील?
उपचारानंतर ते शहरी वस्तीतून किमान 10 किलोमीटर दूर असलेल्या वनक्षेत्रात सोडले जातील.

माकड पकडण्यासाठी सरकारचे मानधन किती आहे?
10 माकडांपर्यंत – प्रति माकड 600 रुपये
10 पेक्षा जास्त – प्रति माकड 300 रुपये
कमाल देयक – 10,000 रुपये
1 ते 5 माकडांसाठी – 1,000 रुपये प्रवास खर्च

तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया काय आहे?
नागरिकांनी उपद्रवाची तक्रार दिल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी तपास करून उपद्रवाची तीव्रता आणि नुकसानाचा अहवाल तयार करतील. त्यानंतर पकड पथक माकड पकडण्याची कारवाई करेल.

येथे वाचा – तुरीवर शेवटची फवारणी आणि मिळवा टपोरे दाणे,  आळी 100% खल्लास..

Leave a Comment

Join WhatsApp Group