आज मुंबईत घरांची लॉटरी; कुणाला लागणार घर? पहा BMC लॉटरी अपडेट..

BMC Housing Scheme : मुंबईतील नागरिकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) एक गृहनिर्माण योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत मुंबईतील विविध ठिकाणी एकूण 426 घरे उपलब्ध करून देण्यात आली होती. या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आधीच संपलेली असून, अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व अर्जदारांच्या मनात एकच प्रश्न होता तो म्हणजे या घरांची लॉटरी नेमकी कधी जाहीर होणार?

आज (13 डिसेंबर 2025) लॉटरीचा निकाल जाहीर होणार

या संदर्भात आता महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती समोर आली आहे. BMC गृह योजनेची लॉटरी (BMC housing lottery) आज, 13 डिसेंबर 2025 रोजी जाहीर केली जाणार आहे. महानगरपालिकेकडून लॉटरीचा निकाल आजच प्रसिद्ध केला जाणार असून, संध्याकाळपर्यंत विजेत्यांची नावे अधिकृत वेबसाईटवर अपलोड केली जाण्याची शक्यता आहे.

426 घरांसाठी किती अर्ज आले?

या गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,
426 घरांसाठी एकूण 2157 अर्ज दाखल झाले आहेत. कोणत्या ठिकाणी किती अर्ज आले आहेत, याची माहिती पुढे आहे.

असे आलेत अर्ज

मुंबई महानगरपालिकेच्या हाउसिंग लॉटरीसाठी कुठे किती अर्ज आले जाणून घ्या.. अर्जांची ठिकाणनिहाय आकडेवारी पाहिली असता, प्रेस्टिज भायखळा येथे ४२ घरांसाठी ११२ अर्ज प्राप्त झाले आहेत. एलबीएस मार्ग, भांडुप (प.) येथे सर्वाधिक म्हणजे २४० घरांसाठी १२९ अर्ज दाखल झाले. मात्र सर्वाधिक चुरस १६/ए मरोळ, अंधेरी (पू.) येथे पाहायला मिळाली असून, अवघ्या १४ घरांसाठी तब्बल ९३७ अर्ज आले आहेत. मजासगाव, जोगेश्वरी (पू.) येथे ४६ घरांसाठी ३९३ अर्ज, तर त्रिलोक पार्क, कांदिवली (प.) येथे ४ घरांसाठी ८३ अर्ज दाखल झाले आहेत. स्वामी विवेकानंद मार्ग, गोरेगाव (पू.) येथे १९ घरांसाठी १८९ अर्ज, कांदिवली (प.) येथे ३० घरांसाठी ११५ अर्ज, कांजूर–आदि अल्लूर येथे २७ घरांसाठी ५५ अर्ज, तर सागर वैभव सोसायटी, कांदिवली येथे ४ घरांसाठी केवळ २४ अर्ज प्राप्त झाले आहेत.

येथे वाचा – पुणे म्हाडा लॉटरीची तारीख ठरली; या दिवशी वाटणार ४ हजार घरे..

निकाल कुठे आणि कसा पाहाल?

ज्या नागरिकांनी BMC च्या या गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज केला आहे, त्यांनी आज नक्कीच महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

अर्जदारांसाठी महत्त्वाची माहिती

आजचा दिवस अर्जदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
ज्यांनी महानगरपालिकेच्या घरांसाठी अर्ज केला आहे, त्यांनी निकाल जाहीर होताच तो तपासावा आणि पुढील प्रक्रियेसाठी आवश्यक सूचना लक्षात घ्याव्यात.

Leave a Comment

Join WhatsApp Group