Crop Fertilizer : ऐन हंगामात खताच्या दुकानावर ‘युरिया शिल्लक नाही’ अशी पाटी दिसली की शेतकऱ्याचा जीव टांगणीला लागतो. पिकाला नायट्रोजनची गरज असताना युरिया मिळाला नाही तर काय करायचे? काळजी करू नका! युरियाला एक असा जबरदस्त पर्याय उपलब्ध आहे, जो पिकाला केवळ नायट्रोजनच देत नाही तर जमिनीची तब्बेतही सुधारतो. जाणून घ्या या ‘पावरफुल’ खताबद्दल…
सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे, ती म्हणजे ‘युरियाचा शॉर्टेज’. पिकाला खत द्यायची वेळ झाली आहे आणि दुकानांमध्ये युरिया मिळत नाहीये, किंवा त्यासाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. पण मित्रांनो, युरिया मिळाला नाही म्हणून हातबल होण्याची गरज नाही. उलट, ही एक संधी आहे पिकाला युरियापेक्षाही एक दर्जेदार पर्यायी खत देण्याची.. आजच्या या बातमीत आपण जाणून घेणार आहोत की, युरिया नसेल तर नेमकं कोणतं खत वापरावं? आणि ते युरियापेक्षा फायदेशीर का ठरू शकतं?
येथे वाचा – कांदा पिकावर देशी दारूची फवारणी; पहा जबरदस्त जुगाड..
वापरा हे खत.. युरिया पेक्षा जबरदस्त रिझल्ट
आपल्याला सवय झाली आहे ती म्हणजे पोतच्या पोतं युरिया ओतायची. युरियामध्ये ४६% नायट्रोजन असते, हे खरंय. युरिया टाकला की चौथ्या-पाचव्या दिवशीच पिकाला काळोखी येते, पिकं टवटवीत दिसतात. पण मंडळी, युरियाचं एक गणित आहे – “चार दिवसाची चांदणी आणि पुन्हा काळोखी रात्र!” म्हणजे काय? तर युरियाचा प्रभाव पिकावर खूप कमी काळ टिकतो. तो पिकाला लवकर लागू होतो आणि त्याची ताकद तितक्याच लवकर संपून जाते. पिकाला दीर्घकाळ ताकद पुरवण्यात युरिया कमी पडतो. मग पर्याय काय? उत्तर आहे – ‘अमोनियम सल्फेट’ खत..
जर तुम्हाला युरिया मिळत नसेल, तर डोळे झाकून तुम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या ‘अमोनियम सल्फेट’ (Ammonium Sulphate) या खताचा वापर करू शकता. का? याची कारणं खालीलप्रमाणे आहेत:
१. दुहेरी ताकद (Double Dhamaka):
युरियातून फक्त नायट्रोजन मिळतं. पण अमोनियम सल्फेटमधून पिकाला दोन गोष्टी मिळतात:
२१% नायट्रोजन: जे पिकाच्या वाढीसाठी गरजेचं आहे.
२४% सल्फर (गंधक): जे पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं आणि दाणे भरण्यास मदत करतं.
२. पिकाला हळूहळू लागू होणारं टॉनिक:
अमोनियम सल्फेटचा सर्वात मोठा गुणधर्म म्हणजे ते ‘स्लो रिलीज’ (Slow Release) खत आहे. म्हणजे काय? तर हे खत पिकाला एकदम लागू न होता, हळूहळू आणि दीर्घकाळापर्यंत नायट्रोजन पुरवत राहतं. त्यामुळे पिकाची वाढ सातत्याने होते आणि हिरवेपणा जास्त काळ टिकून राहतो.
३. जमिनीचा डॉक्टर:
बऱ्याच शेतकऱ्यांची जमीन ही क्षारपड किंवा क्षारयुक्त (Saline Soil) असते. अशा जमिनीत अमोनियम सल्फेट हे अमृतासारखं काम करतं. हे खत जमिनीचा पीएच (pH) लेव्हल बॅलन्स करण्यास मदत करतं, ज्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो.
येथे वाचा – कांदा पिकावर देशी दारूची फवारणी; पहा जबरदस्त जुगाड..
शेतकरी मित्रांनो, युरिया मिळत नाही म्हणून पिकाची हेळसांड होऊ देऊ नका. अमोनियम सल्फेट हे केवळ पर्याय नाही, तर अनेक बाबतीत युरियापेक्षा उजवं खत आहे. त्यामुळे या हंगामात युरियाच्या मागे धावण्यापेक्षा अमोनियम सल्फेटचा वापर करून बघा, तुमच्या पिकातला फरक तुम्हालाच दिसून येईल.
टीप: खताचे प्रमाण आपल्या पिकाच्या गरजेनुसार आणि कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच वापरावे.