शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा… ४८२ कोटींची अतिवृष्टी मदत मंजूर; पहा तुमच्या जिल्ह्याला किती?

जून–ऑक्टोबर अतिवृष्टी आणि अवकाळी नुकसानभरपाई मंजूर; राज्य सरकारचा जीआर जाहीर

Ativrushti nuksan bharpai : राज्यात जून ते ऑक्टोबर 2025 दरम्यान झालेल्या अतिवृष्टी, पुरपरिस्थिती आणि अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकसानग्रस्त 4 लाख 6 हजार 430 हेक्टर क्षेत्रासाठी तब्बल 482 कोटी 10 लाख 69 हजार रुपयांच्या मदतवाटपाला मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय मंगळवारी (9 डिसें.) अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आला. मदत फक्त 2 हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांना दिली जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

सरकारच्या आकडेवारीनुसार, केवळ जून ते सप्टेंबर या काळातच 84 लाख हेक्टर शेतीपिकांवर अतिवृष्टीचा गंभीर परिणाम झाला. या नुकसानीसाठी राज्याने 31 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले असले, तरी प्रत्यक्ष जीआरमध्ये मदतदर आणि निकष जुनेच ठेवले गेले, त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी मदत तुटपुंजीच राहणार असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

नागपूर विभागासाठी मंजूर निधी

नागपूर विभागातील पाच जिल्ह्यांना 0–2 हेक्टर मर्यादेत एकूण 209 कोटी 38 लाख 91 हजार रुपये वाटपाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यातील प्रमुख मदत पुढीलप्रमाणे: चंद्रपूर – 28 कोटी 98 लाख 55 हजार, नागपूर – ऑक्टोबरमधील अवकाळीसाठी 17 कोटी 23 लाख 64 हजार, गडचिरोली – 33 लाख 30 हजार, भंडारा – ऑक्टोबर अवकाळी: 84 कोटी 69 लाख 26 हजार; जूनसाठी 56 हजार, गोंदिया – 78 कोटी 13 लाख 60 हजार

येथे वाचा – हरभऱ्यात मर रोगला ब्रेक! पहिली फवारणी देणार जबरदस्त फुटवे

अमरावती विभागासाठी वाटप

ऑक्टोबरमधील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीसाठी यवतमाळ जिल्ह्यास 8 कोटी 12 लाख 1 हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.

पुणे विभागातील तीन जिल्ह्यांना दिलासा

ऑक्टोबर महिन्यातील अवकाळीमुळे प्रभावित झालेल्या कोल्हापूर, पुणे आणि सांगली जिल्ह्यांसाठी एकूण 11 कोटी 90 लाख 16 हजार रुपये मंजूर झाले आहेत. कोल्हापूर – 1 कोटी 25 लाख 6 हजार, पुणे – 10 कोटी 59 लाख 26 हजार, सांगली – 5 लाख 84 हजार

कोकण विभागातील पाच जिल्ह्यांना 48 कोटींचा हात

कोकणमध्ये ऑक्टोबरमधील अतिवृष्टी व अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीसाठी 48 कोटी 59 लाख 9 हजार रुपये वाटपाला मंजुरी देण्यात आली आहे. ठाणे – 16 कोटी 81 लाख 89 हजार, पालघर – 9 कोटी 32 लाख 36 हजार, रायगड – 14 कोटी 69 लाख 33 हजार, रत्नागिरी – 3 कोटी 66 लाख 82 हजार, सिंधुदुर्ग – 4 कोटी 8 लाख 69 हजार

येथे वाचा – फवारणी खर्च कमी आणि जास्त उत्पादन; शेतकऱ्यांनो ही ट्रिक जास्त फायद्याची..

नाशिक विभागात 204 कोटींचे वाटप

नाशिक विभागातील ऑक्टोबरमधील नुकसानीसाठी एकूण 204 कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर करण्यात आला. नाशिक – 49 कोटी 93 लाख 39 हजार, धुळे – 56 कोटी 96 लाख 56 हजार, नंदुरबार – 29 कोटी 78 लाख 66 हजार, जळगाव – 59 कोटी 78 लाख 37 हजार, अहिल्यानगर – 7 कोटी 63 लाख 54 हजार

2 ते 3 हेक्टर शेतकऱ्यांसाठीही निधी

चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑगस्ट व सप्टेंबरमधील अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी 3 हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी अतिरिक्त 2 कोटी 29 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

Leave a Comment

Join WhatsApp Group