खुशखबर! अतिवृष्टी भरपाई वाटप यादी जाहीर.. या जिल्ह्याची यादी प्रसिद्ध.. येथे डाउनलोड करा यादी

Ativrushti Labharthi Yadi : शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आपले मोठे नुकसान झाले. नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत अनेक दिवस गेले, पण आता पारदर्शकतेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. राज्यातील एका प्रमुख जिल्ह्याची संपूर्ण लाभार्थी यादीच अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे! हा जिल्हा नक्की कोणता? या यादीत तुमचं नाव आहे की नाही? हे आता एका क्लिकवर समजणार आहे. चला तर मग, जाणून घेऊया सविस्तर माहिती आणि पाहूया ती यादी..

नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपण एका अतिशय महत्त्वाच्या अपडेटबद्दल बोलणार आहोत, ज्याची प्रतीक्षा अनेक दिवसांपासून आपल्या बळीराजाला होती. २०२५ च्या खरीप हंगामात राज्याच्या विविध भागांत ढगफुटीसदृश पाऊस झाला आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. शासनाने हजारो कोटींचा निधी मंजूर केला, पण अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे— माझी मदत जमा झाली का? आणि झाली तर किती?

पारदर्शकतेसाठी शासनाचे मोठे पाऊल

गेल्या काही काळात जालना आणि बीड सारख्या जिल्ह्यांमध्ये मदत वाटपात गोंधळ झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. काही ठिकाणी पात्र नसतानाही मदत मिळणे किंवा पात्र असूनही वंचित राहणे, असे प्रकार घडले. याला चाप लावण्यासाठी आणि कारभारात ‘पारदर्शकता’ आणण्यासाठी शासनाने स्पष्ट निर्देश दिले होते की, ज्या शेतकऱ्यांना मदत वाटप झाली आहे, त्यांची यादी सार्वजनिकरीत्या प्रसिद्ध करावी. जेणेकरून प्रत्येकाला कळेल की कुणाला किती मदत मिळाली आहे.

येथे वाचा – कोंबड्यांना चक्क दारूचा डोस.. खायला मेथी.. पहा सक्सेसफुल गावरान कुक्कुट पालन

या जिल्ह्याची यादी प्रसिद्ध

याच आदेशाचे पालन करत, अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्हाधिकारी कार्यालयाने एक अतिशय कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाईची लाभार्थी यादी ऑनलाइन पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अहिल्यानगर हा सर्वाधिक लाभार्थी संख्या आणि मोठे नुकसान असलेला जिल्हा आहे, त्यामुळे या निर्णयाचा फायदा लाखो शेतकऱ्यांना होणार आहे. तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्याचे रहिवासी असाल, तर तुम्ही ahilyanagar.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुमचं नाव तपासू शकता.

येथे वाचा – पीक विम्याचे 50 हजार मिळणार? पहा तुम्हाला मिळणार का?

कोणत्या तालुक्यांच्या याद्या उपलब्ध?

पोर्टलवर गेल्यानंतर तुम्हाला सर्व तालुक्यांची नावानुसार यादी पाहायला मिळेल. तसेच, ज्यांचे KYC पेंडिंग आहे, त्यांची वेगळी यादी सुद्धा देण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील तालुक्यांचा समावेश आहे:
अकोले, जामखेड, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पारनेर, पाथर्डी, राहता, राहुरी, संगमनेर..
तुम्ही तुमच्या तालुक्याची PDF फाईल डाऊनलोड करून त्यामध्ये तुमचे नाव आणि जमा झालेली रक्कम सहज पाहू शकता.

येथे वाचा – आता नमो शेतकरीचा हप्ता विसरा.. लाखो शेतकऱ्यांना 8 वा हप्ता नाही..  पहा हप्ता का अडकणार?

इतर जिल्ह्यांचे आणि प्रलंबित अनुदानाचे काय?

अहिल्यानगर प्रमाणेच आता इतर जिल्ह्यांनी सुद्धा आपापल्या याद्या प्रकाशित कराव्यात, अशा सूचना आहेत. त्यामुळे लवकरच यवतमाळ, बुलढाणा, जळगाव आणि इतर जिल्ह्यांच्या याद्याही आपल्याला पाहायला मिळू शकतात. तसेच, ज्या शेतकऱ्यांची मदत अजूनही जमा झालेली नाही, त्यांच्यासाठी १५ जानेवारीनंतर पुढील टप्प्यातील वाटप प्रक्रिया सुरू होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे खचून जाऊ नका, लवकरच सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होईल अशी आशा करूया. मित्रांनो, ही माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहचवा, जेणेकरून त्यांनाही आपली मदत आली आहे की नाही, हे खात्रीने तपासता येईल.

येथे डाउनलोड करा यादी..
यादी पाहण्यासाठी शासनाच्या ahilyanagar.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Leave a Comment

Join WhatsApp Group