Ativrushti Anudan Yadi : राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या विहिरींचं नुकसान झालं होतं, त्यांच्यासाठी राज्य सरकारने दिलासादायक पाऊल उचललं आहे. या नुकसानीची भरपाई म्हणून जाहीर करण्यात आलेल्या ३०,००० रुपयांच्या मदतीसाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या आता प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत. तुमचं नाव या यादीत आहे का? हे कसं तपासायचं आणि अनुदानाची प्रक्रिया नक्की कशी असणार आहे, हे जाणून घेण्यासाठी ही पोस्ट नक्की वाचा!
नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात राज्याच्या अनेक भागात जोराचा पाऊस झाला. या अतिवृष्टीचा फटका शेतीला तर बसलाच, पण त्यासोबतच अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींचंही मोठं नुकसान झालं. पुराचं पाणी विहिरीत घुसल्यामुळे गाळ साचणं किंवा विहिरीची पडझड होणं, अशा समस्यांना अनेक बळीराजाला सामोरं जावं लागलं. या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्य शासनाने एक विशेष पॅकेज जाहीर केलं होतं. ज्यानुसार, प्रति विहीर ३०,००० रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी पंचनामे झाले, शेतकऱ्यांनी अर्ज भरले आणि आता प्रतीक्षा होती ती लाभार्थी यादीची.. तर मित्रांनो, ती वेळ आता आली आहे. या योजनेचा सविस्तर आढावा आणि सध्याची स्थिती खालीलप्रमाणे आहे:
किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
शासनाकडे आलेल्या अर्जांमधून छाननी अंती एकूण ११,८१३ विहिरी या मदतीसाठी पात्र ठरल्या आहेत. नोव्हेंबर २०२५ मध्येच या योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी १८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.
येथे वाचा – अवघ्या २०० रुपयांत गव्हाचे उत्पादन वाढवणारा ‘जादुई’ फॉर्म्युला! ओंबी होईल १ फूट लांब
अनुदानाचे स्वरूप कसे आहे?
एकूण मदत: ३०,००० रुपये
ही मदत दोन टप्प्यांत दिली जाणार आहे:
पहिला टप्पा: १५,००० रुपये (हे अनुदान वितरीत होण्यास सुरुवात झाली आहे).
दुसरा टप्पा: उर्वरित १५,००० रुपये (दुरुस्तीचं काम सुरू झाल्यावर किंवा कामाची पाहणी केल्यानंतर हे पैसे दिले जातील).
लाभार्थी यादी कुठे पहाल?
सध्या सांगली आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
तुम्ही या जिल्ह्यांच्या अधिकृत वेबसाईटला (जसे की solapur.gov.in किंवा sangli.gov.in) भेट देऊन ‘अनाउन्समेंट’ किंवा ‘नोटिफिकेशन’ सेक्शनमध्ये ही यादी पाहू शकता. यामध्ये तालुका निहाय आणि शेतकऱ्यांच्या नावानुसार यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
येथे वाचा – 2026 चा पीक विमा पाहिजे? ताबतोब करा हे काम
इतर जिल्ह्यांचं काय?
फक्त सांगली आणि सोलापूरच नाही, तर अहिल्यानगर (अहमदनगर), बीड, लातूर, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांमध्येही विहिरींचं मोठं नुकसान झालं होतं. या जिल्ह्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध होणार आहेत. जशा या याद्या उपलब्ध होतील, तसे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू.
महत्वाची टीप:
जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुमचं नाव पहिल्या यादीत नसेल, किंवा तुम्हाला अद्याप पहिला हप्ता मिळाला नसेल, तर निराश होऊ नका. प्रक्रिया सुरू आहे आणि टप्प्याटप्प्याने सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. दुसऱ्या हप्त्याबद्दलचे अपडेट्स (म्हणजेच कामाची पाहणी आणि पुढील वितरण) शासनाकडून जसे येतील, तसे आम्ही तुम्हाला कळवूच.