Ativrushti Anudan : शेतकरी मित्रांनो, अखेर तो दिवस उजाडला ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो. २४ जानेवारी २०२६ पासून राज्य सरकारने अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई (Anudan) शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे. पण थांबा… तुमच्या मोबाईलवर बँकेचा मेसेज आलाय का? जर तुमचे मित्र किंवा शेजाऱ्यांचे पैसे जमा झाले असतील आणि तुमचे मात्र अजून आले नसतील, तर चिंतेचं कारण असू शकतं. तुमचे पैसे नेमके कुठे अडकलेत? तुमची KYC पूर्ण आहे का? की पैसे दुसऱ्याच कोणत्यातरी जुन्या खात्यात जमा झालेत? हे सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी आणि तुमच्या हक्काचे पैसे शोधण्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
तुमचे पेमेंट स्टेटस एका क्लिकवर कसे चेक कराल?
तुम्हाला तहसील कार्यालयात खेटे मारण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवर स्टेटस पाहू शकता:
१. वेबसाइटवर जा: ‘MS Disaster Management’ (mahaiit.org) या शासकीय पोर्टलला भेट द्या.
२. V-K नंबर: तुमच्याकडे असलेला V-K नंबर तिथे टाका आणि सबमिट करा.
३. माहिती पहा: तिथे तुम्हाला तुमचे नाव, बँक खाते क्रमांक आणि तारीख दिसेल.
जर ‘Success’ असा रिमार्क असेल, तर अभिनंदन! तुमचे पैसे जमा झाले आहेत.
जर ‘Pending’ किंवा एरर असेल, तर मात्र तुम्हाला तात्काळ तहसील कार्यालयात संपर्क साधावा लागेल.
पैसे आलेत पण कोणत्या बँकेत?
अनेकदा असं होतं की आपण एक खाते क्रमांक देतो, पण पैसे ‘आधार लिंक’ असलेल्या दुसऱ्याच खात्यात (DBT द्वारे) जमा होतात. ते शोधण्यासाठी:
NPCI पोर्टलवर (npci.org.in) जा आणि ‘Consumer’ टॅबमध्ये ‘Bharat Aadhaar Seeding Enabler’ निवडा.
तिथे तुमचा आधार नंबर टाकून OTP व्हेरिफाय करा.
तिथे तुम्हाला स्पष्ट दिसेल की कोणत्या बँकेत तुमचे खाते आधारशी मॅप (Map) झाले आहे. तुमचे पैसे त्याच खात्यात जमा झालेले असतील.
येथे वाचा – हरभरा पिकासाठी शेवटची मॅजिक फवारणी.. शेवटच्या टप्प्यात घाटी एकदम टरटरून भरेल
पैसे का जमा झाले नाहीत? ही असू शकतात कारणं:
सरकारने पैसे तर पाठवले आहेत, पण जर तुमच्या खात्यात रक्कम दिसत नसेल तर त्याची प्रमुख दोन कारणे असू शकतात:
१. तुमची e-KYC पेंडिंग असणे.
२. तुमचे बँक खाते आधारशी लिंक (Aadhar Seeding) नसणे.
येथे वाचा – सर्व बँकांना कर्जमाफीचे निर्देश.. शेतकऱ्यांनो तातडीने हे काम करा.. नाहीतर वंचित रहाल
महत्वाचा सल्ला: शेतकरी मित्रांनो, जर या दोन्ही ठिकाणी सर्व काही बरोबर असूनही पैसे आले नसतील, तर उशीर न करता आपल्या कृषी सहाय्यकाशी किंवा तहसीलदारांशी संपर्क साधा.