Loan scheme for women : महिला आजच्या काळात उद्योग व्यवसायाकडे वळू लागल्या आहेत. पण स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करायचा असो किंवा घरगुती उद्योग मोठा करायचा असो, भांडवलाची अडचण अनेक महिलांना मागे ढकलते. अशा वेळी १५ लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज देणारी ही योजना अनेकांच्या आयुष्यात खरोखरच परिवर्तन घडवू शकते. आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग खुला करणारी ही संधी महिलांसाठी किती महत्त्वाची आहे, हे सांगण्याची गरजच नाही. ही योजना नेमकी कोणती? आणि अर्ज नेमका कुठे करायचा? चला जाणून घेऊया..
महिलांना 15 लाखांपर्यतचे बिनव्याजी कर्ज
राज्यात पर्यटन क्षेत्राला नवसंजीवनी मिळावी आणि महिलांना स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी सक्षम करता यावे, यासाठी राज्य सरकारने ‘आई’ नावाचे विशेष महिला-केंद्रित पर्यटन धोरण सुरू केले आहे. या उपक्रमांतर्गत महिलांना १५ लाख रुपयेपर्यंत विनातारण आणि बिनव्याजी कर्ज मिळू शकणार आहे. पर्यटनाशी संबंधित छोट्या-मोठ्या व्यवसायात आधीच काम करणाऱ्या महिला किंवा पर्यटन क्षेत्रात नवा उपक्रम सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी ही योजना मोठी संधी ठरणार आहे.
येथे वाचा – महिलांनो! तारीख ठरली.. लाडक्या बहिणीचे पैसे खात्यात जमा होणार, पहा तारीख..
या योजनेत पर्यटन क्षेत्रातील ४१ वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायांसाठी महिलांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. विशेष म्हणजे, हे संपूर्ण कर्ज विनातारण आणि व्याजमुक्त असल्याने महिलांना आर्थिकदृष्ट्या मोठा आधार मिळतो.
कोणत्या अटी आहेत?
संबंधित पर्यटन व्यवसायाची पर्यटन संचालनालयात नोंदणी आवश्यक. व्यवसाय पूर्णतः महिलांच्या मालकीचा आणि त्यांच्या नियंत्रणाखाली असावा. व्यवस्थापनासह किमान ५०% कर्मचारी महिला असणे बंधनकारक. व्यवसायासाठी आवश्यक सर्व परवानग्या घेतलेल्या असाव्यात, कर्जाचे हप्ते निर्धारित वेळेत भरावे लागतील. कर्जदार महिला, त्यांचा व्यवसाय आणि कर्ज देणारी बँक — तिन्हीही राज्यात असणे आवश्यक
येथे वाचा – महिलांनो! तारीख ठरली.. लाडक्या बहिणीचे पैसे खात्यात जमा होणार, पहा तारीख..
किती मिळणार कर्ज?
पर्यटनाशी संबंधित व्यवसाय उभारण्यासाठी बँकेकडून १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर केले जाईल. कर्जदार महिला वेळेवर हप्ते भरत असल्यास, कर्जावरील व्याजाची रक्कम (कमाल १२% पर्यंत) पर्यटन संचालनालय परत करणार आहे. हा व्याज परतावा —कर्ज फेडून पूर्ण होईपर्यंत, किंवा ७ वर्षे पूर्ण होईपर्यंत, किंवा एकूण ४.५० लाखांच्या मर्यादेपर्यंत —
यापैकी जे आधी पूर्ण होईल तेवढा दिला जाईल.
अर्ज कुठे करावा?
योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी maharashtratourism.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच नाशिकच्या पर्यटन भवन (शासकीय विश्रामगृह परिसर) येथे संपर्क (०२५३-२९९५४६४) साधू शकता. ई-मेलद्वारे अर्ज करायचा असल्यास : ddtourism.nashik-mh@gov.in