Crop Insurance 2026 : शेतकरी मित्रांनो, पीक विमा भरलाय पण तो मिळेल याची गॅरंटी आहे का? अनेकदा विमा भरूनही ऐनवेळी नुकसान भरपाई मिळत नाही, आणि मग आपण नशिबाला दोष देतो. पण खरं कारण वेगळंच असतं! सध्या रब्बी हंगामात हवामान बिघडतंय आणि नुकसानीची शक्यता आहे. अशा वेळी तुमचा पीक विमा मंजूर व्हावा असं वाटत असेल, तर एक छोटी पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट आजच तपासून घ्या. या ब्लॉगमध्ये जाणून घ्या, ई-पीक पाहणी आणि विमा क्लेम मिळवण्याचं नेमकं गणित काय आहे.
पीक विमा मिळवायचा असेल तर हे करा
नमस्कार शेतकरी बांधवांनो! सध्या शेतीमध्ये काय परिस्थिती आहे, हे आपण सर्वजण जाणतोच. कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी नियम! आपण मोठ्या आशेने पिकाचा विमा भरतो. कशासाठी? तर उद्या जर नैसर्गिक आपत्ती आली, गारपीट झाली किंवा अवकाळी पाऊस झाला तर आपल्या हक्काचे चार पैसे नुकसान भरपाई म्हणून मिळावेत. पण अनेकदा असं होतं की, नुकसान होऊनही विमा कंपनीकडून ‘रिजेक्ट’चा मेसेज येतो किंवा यादीत नावच येत नाही. मग आपल्याला प्रश्न पडतो, “अरे, मी तर हप्ता भरला होता, मग मलाच का नाही मिळाला?” शेजारच्याला मिळतो, पण आपल्याला नाही. याचं मुख्य कारण आज आपण समजून घेणार आहोत. सरकारचे नियम दिवसेंदिवस कडक होत आहेत, त्यामुळे ‘ह्या’ गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
सध्याची परिस्थिती काय आहे?
सध्या वातावरणात बदल होत आहेत, ढगाळ वातावरण तयार झालंय आणि रब्बी हंगामातील पिकांना धोका निर्माण होऊ शकतो. खरिपाच्या वेळी पावसाने झोडपलं, पण त्यावेळी काही तांत्रिक कारणांमुळे (ट्रिगर न बसल्यामुळे) अनेकांना विमा मिळाला नाही. आता खरीप 2025 चा विमा साधारण २० जानेवारीनंतर मिळण्याची शक्यता आहे (ज्यांचे नुकसान सिद्ध झाले आहे त्यांना). पण आता रब्बी हंगामासाठी ज्यांनी विमा भरला आहे, त्यांच्यासाठी हा ‘अलर्ट’ आहे.
येथे वाचा – सोयाबीन भाव 5300 च्या घरात; ‘या’ महिन्यापासून दरात मोठी वाढ शक्य..
ही चूक महागात पडू शकते!
तुम्ही रब्बीसाठी गहू, हरभरा, ज्वारी किंवा इतर कोणत्याही पिकाचा विमा भरला असेल, तर एक गोष्ट तातडीने तपासा – ती म्हणजे ‘ई-पीक पाहणी’ (E-Pik Pahani). होय, फक्त विमा भरला म्हणजे काम संपलं असं नाही. पीक विमा मिळण्यासाठी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे तुमच्या विम्याच्या पावतीवर असलेली माहिती आणि सातबाऱ्यावर केलेली ई-पीक पाहणी यांची माहिती तंतोतंत जुळली पाहिजे.
येथे वाचा – पांढरं सोनं 9 हजाराच्या दिशेने.. आता तब्बल एवढे वाढले कापूस भाव..
नेमका गोंधळ कुठे होतो?
समजा, तुम्ही २ एकर हरभऱ्याचा विमा भरला आहे. पण ई-पीक पाहणी करताना जर तिथे ३ एकर नोंद झाली किंवा पिकाचं नाव वेगळं लागलं, तर तुमचा ताळमेळ चुकला!
नियम सोपा आहे: जेवढ्या क्षेत्राचा विमा हप्ता भरला आहे, तेवढंच क्षेत्र आणि तेच पीक तुमच्या ई-पीक पाहणीत दिसलं पाहिजे.
तुम्हाला काय करायचं आहे?
१. तुमची पीक विम्याची पावती हातात घ्या.
२. त्यावर जे पीक (उदा. गहू, हरभरा) आणि जेवढं क्षेत्र (उदा. १ हेक्टर किंवा २० गुंठे) लिहिलं आहे, तेच ई-पीक पाहणी ॲपमध्ये नोंदवा.
३. दुसऱ्यावर अवलंबून राहू नका: अनेकदा आपण तलाठी किंवा कृषी सहाय्यक करतील म्हणून सोडून देतो, किंवा सीएससी सेंटरवर जाऊन माहिती भरतो. पण तिथे गडबड होऊ शकते. त्यांनी जर अंदाजे आकडे टाकले आणि तुमचा ‘मॅच’ झाला नाही, तर नुकसान तुमचं होणार आहे.
४. त्यामुळे स्वतःच्या शेतात जा, जिओ-टॅगिंग करा आणि अचूक माहिती भरा.
येथे वाचा – चक्क 90% अनुदानावर ट्रॅक्टर.. या जिल्ह्यासाठी अर्ज सुरू
थोडक्यात सांगायचं तर…
विमा कंपनीला नकार देण्यासाठी आयतच कारण नको असते. ‘माहिती जुळत नाही’ (Data Mismatch) हे कारण पुढे करून क्लेम नाकारले जातात. त्यामुळे नुकसान होण्याची वाट बघू नका. आधीच आपली कागदपत्र आणि ऑनलाईन रेकॉर्ड ‘क्लिअर’ ठेवा.
जर तुम्ही अजून ई-पीक पाहणी केली नसेल, तर ती लवकरात लवकर उरकून घ्या. कारण ही छोटीशी चूक तुम्हाला हजारो रुपयांच्या मदतीपासून वंचित ठेवू शकते.