जमिनीचे 100 वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड मोबाईलवर! फक्त 5 मिनिटांत असे करा डाऊनलोड

Land Records : तुम्हाला तुमच्या जमिनीचे जुने रेकॉर्ड, जसे की जुने फेरफार, जुना सातबारा किंवा इतर महत्त्वाची कागदपत्रे हवी आहेत का? अनेकदा यासाठी तहसील कार्यालयाच्या किंवा सरकारी कचेरीच्या फेऱ्या माराव्या लागतात. पण आता काळजी करण्याचे कारण नाही! महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने आपल्या पोर्टलवर मोठे बदल केले असून, आता तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर जमिनीचे जुने रेकॉर्ड केवळ पाहूच शकत नाही, तर ते अधिकृतरीत्या डाऊनलोड देखील करू शकता. चला तर मग, जाणून घेऊया याची संपूर्ण सविस्तर प्रक्रिया.

महाभूमी अभिलेखचे नवीन ‘E-Records’ पोर्टल

मित्रांनो, जमिनीच्या जुन्या कागदपत्रांसाठी आता ‘डिजिटल सातबारा’ या पोर्टलवर एक खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पूर्वी यासाठी वेगळे पोर्टल होते, परंतु आता सर्व सुविधा एकाच छताखाली आणल्या आहेत. यासाठी तुम्हाला digitalsatbara.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल.

स्टेप 1: लॉगिन प्रक्रिया (Login Process)

पोर्टलवर आल्यावर तुम्हाला लॉगिन करण्यासाठी दोन पर्याय मिळतील:
रेग्युलर लॉगिन: जर तुमचे आधीच अकाऊंट असेल तर युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
OTP बेस लॉगिन: हा सर्वात सोपा मार्ग आहे. तुमचा मोबाईल नंबर टाका आणि त्यावर आलेला OTP वापरून तुम्ही थेट लॉगिन करू शकता.
जर तुमचे अकाऊंट नसेल, तर ‘New User Registration’ वर क्लिक करून तुम्ही स्वतःचे नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर टाकून नवीन अकाऊंट काही मिनिटांत तयार करू शकता. जर तुमचे अकाऊंट नसेल, तर ‘New User Registration’ वर क्लिक करून तुम्ही स्वतःचे नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर टाकून नवीन अकाऊंट काही मिनिटांत तयार करू शकता

येथे वाचा – शेतकऱ्यांसाठी पुढील 48 तास महत्त्वाचे.. या ठिकाणी धो-धो पाऊस कोसळणार.. तोडकर हवामान अंदाज

स्टेप 2: ई-रेकॉर्ड (E-Record) शोधणे

लॉगिन केल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्डवर ‘Digital Satbara’, ‘Digital 7/12’, आणि नव्याने ऍड झालेला ‘E-Record’ (ई-रेकॉर्ड) हा पर्याय दिसेल.
‘E-Record’ वर क्लिक करा.
पुढे तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचे आहे.
महत्वाचे म्हणजे, तुम्हाला कोणत्या कार्यालयातील कागदपत्रे हवी आहेत (उदा. तहसील कार्यालय, नगर भूमापन कार्यालय इ.) ते निवडावे लागेल.
जसे तुम्ही ऑफिस आणि गाव निवडाल, तसे त्या गावात उपलब्ध असलेली कागदपत्रांची यादी (Documents List) तुम्हाला खाली दिसेल. यामध्ये फेरफार, सातबारा, आकारफोड पत्रक, टिपण, गुणाकार पुस्तक असे अनेक जुने दस्तऐवज असू शकतात.

येथे वाचा – कापसाला सोन्याचे दिवस.. क्विंटलमागे तब्बल एवढी वाढ!

स्टेप 3: डॉक्युमेंट पाहणे आणि डाऊनलोड करणे

तुम्हाला जो रेकॉर्ड हवा आहे (उदा. फेरफार), तो निवडा आणि त्याचा नंबर किंवा सर्व्हे नंबर टाकून सर्च करा. सर्च केल्यावर तुम्हाला त्या फेरफाराशी संबंधित सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल.
येथे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत:
Unsigned File (फुकट पाहण्यासाठी): ही फाईल तुम्ही मोफत पाहू शकता. पण लक्षात ठेवा, ही फक्त माहितीसाठी असते आणि तिचा वापर अधिकृत कामासाठी करता येत नाही.
Digitally Signed File (अधिकृत कामासाठी): जर तुम्हाला हे रेकॉर्ड कोर्ट कचेरी किंवा इतर सरकारी कामासाठी हवे असेल, तर तुम्हाला ‘Digitally Signed’ फाईल डाऊनलोड करावी लागेल. यासाठी नाममात्र शुल्क (उदा. ३० रुपये) आकारले जाते.

येथे वाचा – तूर 7000 च्या जवळ.. पहा तुमच्या जिल्ह्यातील भाव

स्टेप 4: रिचार्ज आणि पेमेंट

जर तुम्हाला डिजिटल साईन असलेली फाईल हवी असेल, तर तुमच्या अकाऊंटमध्ये बॅलन्स असणे गरजेचे आहे.
तेथेच ‘Recharge Account’ चा पर्याय असतो.
तुम्ही UPI, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरून १५ रुपयांपासून ते १000 रुपयांपर्यंत कितीही रक्कम रिचार्ज करू शकता.
उदा. १०० रुपये ऍड करून तुम्ही ३-४ फेरफार डाऊनलोड करू शकता.
पेमेंट झाल्यावर ‘Download’ बटनवर क्लिक करा, रक्कम वजा होईल आणि डिजिटल सही असलेली अस्सल प्रत तुमच्या डिव्हाईसमध्ये सेव्ह होईल.

मित्रांनो, १८८० सालापासूनचे जुने रेकॉर्ड आता या ई-रेकॉर्ड सुविधेमुळे सहज उपलब्ध झाले आहेत. आता एजंटकडे जाण्याची किंवा कार्यालयात रांगा लावण्याची गरज उरलेली नाही. ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे तुमच्या शेतकरी मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा.

Leave a Comment

Join WhatsApp Group