45 लाख महिला लाडकी बहीण योजनेतून बाहेर? कोणत्या महिला? पहा खरी माहिती

Ladki Bahin Yojana : नमस्कार मैत्रिणींनो! सध्या तुमच्याही मनात एकच प्रश्न घर करून आहे का? की, ‘माझ्या मैत्रिणीचे पैसे आले, शेजारच्या ताईंचे आले, पण माझ्याच बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता अजून का जमा झाला नाही?’ जर तुम्हीही या चिंतेत असाल आणि वेगवेगळ्या अफवा ऐकून घाबरला असाल, तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे. लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत सध्या काय परिस्थिती आहे आणि पैसे नक्की का अडकले आहेत, याची संपूर्ण आणि खरी माहिती जाणून घेण्यासाठी हे नक्की वाचा!

लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचं नेमकं काय झालं?

मोठ्या प्रतीक्षेनंतर लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू झाले आहे, पण आनंदाच्या बातमीसोबतच अनेक भगिनींना एका मोठ्या चिंतेने ग्रासले आहे. ती म्हणजे, पात्र असूनही खात्यात पैसे जमा न होणे! टीव्ही आणि सोशल मीडियावर बातम्यांचा पूर आला आहे—”४५ लाख महिला बाद झाल्या”, “९० लाख महिला अपात्र झाल्या”, “केवायसी (e-KYC) न केल्यामुळे पैसे थांबले”. या बातम्यांमुळे पात्र लाभार्थी महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पण खरंच असं काही झालं आहे का? चला, यामागचं सत्य समजून घेऊया.

येथे वाचा – या 5 पिकांचा विमा जमा होणार.. तुमचं पीक यादीत आहे का? लगेच तपासा!

अफवांवर विश्वास ठेवू नका!

सध्या मीडियामध्ये जे आकडे फिरत आहेत (४५ लाख किंवा ९० लाख महिला बाद), ते अधिकृत सरकारी आकडे नाहीत. प्रशासनाकडून अजूनही अशी कोणतीही अधिकृत यादी जाहीर झालेली नाही. त्यामुळे “आपले नाव बाद झाले असेल का?” असा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका.

केवायसी (e-KYC) चा गोंधळ आणि सत्य

अनेक महिलांना वाटत आहे की त्यांनी केवायसी केली नाही म्हणून त्यांचे पैसे आले नाहीत. हे काही अंशी खरे असू शकते, पण यात संपूर्ण चूक महिलांची नाही.
निवडणुका, आचारसंहिता, सर्व्हर डाऊन असणे आणि केवायसी केंद्रांवरची गर्दी यामुळे अनेक महिलांना वेळेत केवायसी करणे शक्य झाले नाही. ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळाल्याच्या बातम्या आल्या होत्या, त्यामुळे अनेकजण निश्चिंत राहिले.
आता मुदत संपल्यामुळे ज्यांची केवायसी बाकी आहे, त्यांचे पैसे अडकले असू शकतात. पण आशा आहे की सरकार अशा वंचित महिलांना पुन्हा एक संधी नक्की देईल.

येथे वाचा – पीक कर्जावर सरकारची मोठी सूट! 2 लाखांपर्यंतच्या पीक कर्जाबाबत सरकारचा मोठा निर्णय

बाद होण्यामागे ही आहेत प्रमुख कारणे

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या महिलांचे पैसे आले नाहीत, त्यामागे खालील तांत्रिक कारणे असू शकतात:
सरकारी कर्मचारी पती: जर तुमचे पती सरकारी नोकरीत असतील (उदा. एसटी कर्मचारी, शिक्षक इ.), तर आधार कार्ड लिंक असल्यामुळे सिस्टीमने आपोआप अशा अर्जांना फिल्टर केले असू शकते. अशा महिलांचे हप्ते बंद होऊ शकतात.
इन्कम टॅक्स भरणारे (ITR): ज्यांनी कर्जासाठी किंवा इतर कारणास्तव पतीच्या नावे इन्कम टॅक्स रिटर्न भरला आहे, त्यांचे अर्जही स्क्रुटिनीमध्ये बाद होऊ शकतात.

येथे वाचा – कर्जमाफीतून ‘हे’ शेतकरी बाहेर.. पहा अपात्र शेतकऱ्यांची यादी

पैसे जमा होण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हप्ता वितरण बंद झालेले नाही! मिळालेल्या माहिती प्रमाणे, पैसे पाठवण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने चालू आहे.
आज, उद्या किंवा अगदी सोमवारी सुद्धा तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात.
बँकेच्या सर्व्हरवर लोड असल्याने मेसेज उशिरा येऊ शकतात.

येथे वाचा – खताचे अनुदान खात्यात येणार? पहा सरकारचा नवा नियम

Leave a Comment

Join WhatsApp Group