एकाच वेळी घरांच्या 4 लॉटरी सुरू.. पहा नेमका अर्ज कुठे करायचा?

Housing Lottery Scheme : नवीन वर्ष सुरू झालंय आणि त्यासोबतच अनेकांच्या मनात ‘स्वतःचं हक्काचं घर’ घेण्याचं स्वप्नही जागं झालं असेल. जर तुम्हीही MHADA किंवा सिडकोच्या घरांच्या प्रतीक्षेत असाल, तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे! सध्या महाराष्ट्रात एकाच वेळी तब्बल ४ गृहनिर्माण लॉटरींची (Housing Lottery) प्रक्रिया सुरू आहे. पण नक्की अर्ज कुठे करायचा? नियम काय आहेत? यामुळे तुमचा गोंधळ उडाला असेल, तर काळजी करू नका. आजच्या या ब्लॉगमध्ये आपण सध्या सुरू असलेल्या सर्व महत्त्वाच्या लॉटरींची माहिती सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.

सिडकोची ‘मेगा’ लॉटरी

सिडकोने काढलेली १९,००० घरांची लॉटरी तुम्हाला आठवत असेलच. त्यातीलच शिल्लक राहिलेल्या ९,८८३ घरांसाठी आता पुन्हा एकदा अर्ज मागवण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, २०२४ च्या तुलनेत या घरांच्या किमतीत १० टक्के कपात करण्यात आली आहे.
लोकेशन: ही घरे रेल्वे स्टेशनच्या जवळ म्हणजेच ‘प्राईम लोकेशन’ला आहेत. यामध्ये मानसरोवर, खांदेश्वर, वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, तळोजा, पनवेल आणि कळंबोली या ठिकाणांचा समावेश आहे.
विशेष लाभ: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) अर्जदारांना ‘प्रधानमंत्री आवास योजने’अंतर्गत २.५ लाख रुपयांची सबसिडी सुद्धा मिळू शकते.
अंतिम तारीख: या लॉटरीसाठी तुम्ही १४ जानेवारी २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकता.

सिडको ‘फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह’ (FCFS) योजना

ज्यांना लवकरात लवकर घर हवं आहे, त्यांच्यासाठी सिडकोची ४,५०८ घरांची ‘फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह’ (प्रथम येणाऱ्यास प्राधान्य) ही योजना उत्तम आहे.
सद्यस्थिती: ज्यांनी आधीच रजिस्ट्रेशन केले आहे, त्यांच्यासाठी २८ डिसेंबरपासून ‘चॉईस फिलिंग’ (घर निवडणे) चा पर्याय सुरू झाला आहे. तुम्ही पोर्टलवर लॉगिन करून थेट तुम्हाला हव्या त्या इमारतीमधील मजला आणि घर निवडू शकता.
लोकेशन: खारघर (सेक्टर ४०), घणसोली, द्रोणागिरी आणि तळोजा यांसारख्या चांगल्या ठिकाणी ही घरे उपलब्ध आहेत.

येथे वाचा – सिडको लॉटरीसाठी EWS की LIG? अर्ज नक्की कशात करायचा? फायदा कशात?

सिडको ‘नैना’ प्रोजेक्ट लॉटरी (पनवेल)

सिडकोची तिसरी महत्त्वाची लॉटरी ही पनवेल जवळील ‘नैना’ (NAINA) प्रकल्पांतर्गत आहे. जरी यात घरांची संख्या कमी (सुमारे ६१ घरे) असली, तरी ही एक चांगली संधी आहे.
खर्च: यासाठी अर्ज करताना साधारण ३५०० रुपये रजिस्ट्रेशन फी आणि २३६ रुपये चार्जेस असा खर्च आहे. ३ जानेवारीपासून याची प्रत्यक्ष निवड प्रक्रिया सुरू होत आहे.

येथे वाचा – सिडकोचे घर विकता येते का? भाड्याने देता येते का?

पुणेकरांसाठी पीएमआरडीए (PMRDA) लॉटरी

फक्त मुंबई-नवी मुंबईच नाही, तर पुण्यात घर घेणाऱ्यांसाठीही खूशखबर आहे. पीएमआरडीए (PMRDA) च्या हद्दीत ८३३ घरांची लॉटरी निघाली आहे.
लोकेशन: वाल्हेकरवाडी आणि भोसरी (पेठ क्रमांक ३०, ३२, १२) या भागात ही घरे आहेत.
अनामत रक्कम (EMD): EWS साठी ५,००० रुपये आणि LIG गटासाठी १०,००० रुपये अनामत रक्कम भरावी लागेल.
मुदत: या लॉटरीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया १५ डिसेंबरपासून सुरू झाली असून ती २७ जानेवारी २०२६ पर्यंत चालू राहणार आहे.

महत्त्वाचे: या चारही लॉटरी सध्या ॲक्टिव्ह आहेत. प्रत्येकाचे नियम आणि कागदपत्रांच्या अटी वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन माहिती नक्की तपासा. २०२२-२३ नंतर आता २०२६ मध्ये घरांच्या किंमती वाढलेल्या असताना, जुन्या दरात किंवा सवलतीत घर मिळणे ही खरंच एक मोठी संधी आहे.

Leave a Comment

Join WhatsApp Group