यंदा 1972 सारखा दुष्काळ? वाचा काय म्हणले पंजाब डख..

Panjab Dakh Havaman Andaj : शेतकरी मित्रांनो, सध्या सगळीकडे थंडीचा कडाका आहे, पण तुमच्या मनात मात्र भविष्यातील पावसाची चिंता आहे ना? “२०२६ मध्ये दुष्काळ पडेल का?” या एका प्रश्नाने सध्या बऱ्याच शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. याच दरम्यान हवामान तज्ज्ञ पंजाब डख साहेबांनी थेट त्यांच्या हरभऱ्याच्या प्लॉटमधून यावर महत्त्वाचा खुलासा केला आहे. थंडी, ढगाळ वातावरण आणि २०२६ च्या पावसाचं नेमकं गणित काय असणार आहे, हे जाणून घेण्यासाठी ही पोस्ट नक्की वाचा.

नमस्कार शेतकरी बांधवांनो, सध्या वातावरणात होणारे बदल आणि व्हॉट्सॲपवर फिरणाऱ्या मेसेजेसमुळे अनेकदा गोंधळ उडतो. आज आपण पंजाब डख साहेबांनी २८ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या अतिशय महत्त्वाच्या अंदाजावर चर्चा करणार आहोत. साहेबांनी यावेळी दोन मुख्य गोष्टींवर प्रकाश टाकला आहे: एक म्हणजे सध्याचं हवामान आणि दुसरं म्हणजे २०२६ सालच्या दुष्काळाची चर्चा.

थंडी कधीपर्यंत राहणार?

सध्या महाराष्ट्रात जी कडाक्याची थंडी पडत आहे, ती ३ जानेवारी २०२६ पर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे रब्बी पिकांना, विशेषतः हरभऱ्याला या थंडीचा चांगलाच फायदा होणार आहे.

येथे वाचा – हरभरा पिकाची शेवटची फवारणी.. भरघोस उत्पादनासाठी सोपा फॉर्म्युला!

ढगाळ वातावरण, पण पाऊस नाही!

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात, म्हणजेच ४ जानेवारीपासून वातावरणात बदल झालेला दिसेल. पूर्व आणि पश्चिम विदर्भ, दक्षिण-उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि खानदेश या सर्व भागात आकाश अंशतः ढगाळ राहील. पण आनंदाची बातमी ही आहे की, महाराष्ट्रात पाऊस पडणार नाही. हे ढगाळ वातावरण हरभऱ्याला फुलं लागण्यासाठी, कलिंगड आणि उसवाढीसाठी अतिशय पोषक ठरणार आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांनी किंवा इतर शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाची धास्ती घेण्याची गरज नाही. (फक्त तामिळनाडू, केरळ आणि मध्य प्रदेशच्या काही भागात पावसाची शक्यता आहे, पण महाराष्ट्रात नाही.)

येथे वाचा – अखेर कापसाला अच्छे दिन! नव्या वर्षात भाव वाढले.. आणखी किती वाढ होणार?

सर्वात मोठा प्रश्न: २०२६ ला दुष्काळ पडणार का?

अनेक शेतकऱ्यांनी पंजाबरारावांना फोन करून विचारले की, “साहेब, पुढच्या वर्षी दुष्काळ पडेल का?” यावर त्यांनी दिलेलं उत्तर खूप दिलासादायक आहे.
पंजाब डख यांच्या मते, २०२६ मध्ये दुष्काळ पडणार नाही.
त्याचं गणित समजून घ्या:
२०२५ ची स्थिती: या वर्षी अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला. उदाहरणार्थ, परभणीत सरासरी ६५०-७०० मिमी पाऊस पडतो, तिथे १३०० मिमी पडला. सोलापुरात ३५० मिमी ऐवजी ८००-९०० मिमी पाऊस झाला.
२०२६ चे भाकीत: पुढच्या वर्षी इतका अतिवृष्टीसारखा पाऊस पडणार नाही, पण सरासरी इतका पाऊस नक्कीच पडेल. सरासरी पाऊस पडणे म्हणजे दुष्काळ नव्हे! उलट, मर्यादित आणि वेळेवर पडलेला पाऊस पिकांसाठी जास्त फायदेशीर ठरतो.

येथे वाचा – महिला बचत गटांसाठी खुशखबर! सरकारने घेतला हा मोठा निर्णय..

शेतकरी दादांनो, निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करण्यासाठी आपली तयारी लागतेच, पण २०२६ च्या दुष्काळाच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. पंजाब डख साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, हे वर्षही शेतकऱ्यांसाठी चांगलेच असणार आहे. सध्या फक्त आपल्या शेतातील पिकांचे नियोजन करा आणि बिनधास्त राहा.

Leave a Comment

Join WhatsApp Group