paisevari below 50 paise : नमस्कार शेतकरी मित्रांनो! अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे खचून गेला आहात? नुकसान भरपाई आणि पीक विम्याकडे (Crop Insurance) डोळे लावून बसला आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी आशेचा किरण ठरू शकते. अनेक जिल्ह्यांची खरीप हंगामाची ‘अंतिम पैसेवारी’ जाहीर होण्यास सुरुवात झाली असून, आकडेवारी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. तुमच्या जिल्ह्याची आणि गावाची परिस्थिती काय आहे? जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
२०२५ चा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी खरंच एक मोठं आव्हान ठरला. कधी अतिवृष्टीचा फटका तर कधी पावसाने दिलेली ओढ… यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. आता सर्वांच्या नजरा दोनच गोष्टींकडे लागल्या आहेत – एक म्हणजे नुकसान भरपाई आणि दुसरं म्हणजे पीक विमा. पण तुम्हाला माहित आहे का? हे दोन्ही मिळण्यासाठी सर्वात महत्त्वाचा पुरावा काय असतो? तो म्हणजे आपल्या गावाची ‘पीक पैसेवारी’. आनंदाची बाब म्हणजे, १५ डिसेंबर २०२५ पासून अंतिम पैसेवारी जाहीर व्हायला सुरुवात झाली आहे आणि आता हाती आलेल्या माहितीनुसार अनेक जिल्ह्यांची पैसेवारी ५० पैशांच्या खाली आली आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की, हे जिल्हे दुष्काळग्रस्त किंवा नुकसानग्रस्त म्हणून सिद्ध झाले आहेत. चला तर मग, पाहूया कोणत्या जिल्ह्यांची पैसेवारी ५० पैशांच्या आत आली आहे:
येथे वाचा – लाडक्या बहिणींचे पैसे खात्यात जमा; किती हप्ते मिळाले? असे करा चेक..
परभणी जिल्हा (मोठ्या नुकसानीची नोंद) : परभणीत शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे, आणि तेच सरकारी आकडेवारीतही दिसत आहे.
पाथरी तालुका: सर्वात कमी पैसेवारी इथेच नोंदवली गेली आहे – फक्त ३४ पैसे.
परभणी: ३५ पैसे
जिंतूर: ४१.३३ पैसे
गंगाखेड आणि पालम: ४२ पैसे
याशिवाय सेलू, मानवत, सोनपेठ आणि पूर्णा या तालुक्यांची पैसेवारीही ४० ते ४६ पैशांच्या दरम्यान आहे. म्हणजेच संपूर्ण जिल्हा ५० पैशांच्या खाली आहे.
हिंगोली जिल्हा : हिंगोलीतही परिस्थिती वेगळी नाही.
कळमनुरी: इथे ३९.८७ पैसे अशी नीचांकी पैसेवारी आली आहे.
हिंगोली तालुका: ४४.६ पैसे
वसमत, औंढा नागनाथ आणि सेनगाव: हे तालुकेही ४५ ते ४८ पैशांच्या घरात आहेत.
नांदेड जिल्हा (सर्वात जास्त बाधित) : अहिल्यानगर आणि सोलापूरसोबतच नांदेडमध्येही मोठं नुकसान झालं आहे. विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांची पैसेवारी ३२ ते ३७ पैशांच्या घरात रेंगाळतेय. नांदेड, कंधार, लोहा, मुखेड आणि नायगाव यांसारख्या तालुक्यांमध्ये तर पैसेवारी ३२ पैशांवर आली आहे. सरासरी विचार केला तर संपूर्ण जिल्हा ३३-३४ पैशांवर आहे, जे पीक विम्यासाठी खूप महत्त्वाचे ठरेल.
येथे वाचा – यंदा मान्सून कधी येणार? पंजाब डख यांनी सांगितली तारीख.. नवीन वर्षाचा संपूर्ण अंदाज..
अमरावती जिल्हा : विदर्भातील अमरावतीमध्ये तब्बल १९३९ गावांमधील अंतिम पैसेवारी ५० पैशांच्या खाली (सरासरी ४७ पैसे) आली आहे.
तिवसा तालुका: सर्वात कमी ४३ पैसे.
इतर तालुके: धारणी, चिखलदरा, मोर्शी, अचलपूर, आणि चांदूर रेल्वे या सर्वांची पैसेवारी ४६ ते ४९ पैशांच्या दरम्यान आहे.
छत्रपती संभाजीनगर आणि इतर जिल्हे : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ४७.८१ पैसे जाहीर झाली आहे. पैठण आणि स्वतः संभाजीनगर तालुक्यात ४६ पैसे अशी स्थिती आहे.
दुसरीकडे, जालना जिल्ह्यातील ९६५ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या खाली आहे. सांगली जिल्ह्यातील जत आणि संख अप्पर तहसीलमध्ये ५४ गावे बाधित असून तिथेही पैसेवारी ५० पैशांच्या खाली आली आहे.
येथे वाचा – शेतमालाचे पैसे बँकेने कापले? बँकेला दाखवा हा शासन निर्णय.. लगेच पैसे मिळतील!
याचा शेतकऱ्यांना काय फायदा होईल?
तुम्ही म्हणाल, “ही आकडेवारी ठीक आहे, पण आमचा काय फायदा?” तर मित्रांनो, हे समजून घ्या की पैसेवारी ही ‘पीक कापणी प्रयोगावर’ (Crop Cutting Experiments) आधारित असते. जर पैसेवारी ५० पैशांच्या खाली आली, तर त्याचा अर्थ त्या भागात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली आहे. जेव्हा पीक विम्याची आकडेवारी काढली जाते, तेव्हा हाच डेटा आधार म्हणून वापरला जातो. त्यामुळे ज्या गावाची पैसेवारी ५० पैशांच्या खाली आहे, तिथे पीक विमा मिळण्याची शक्यता आणि रक्कम दोन्ही वाढते. लवकरच लातूर, धाराशिव, बीड, सोलापूर आणि अहिल्यानगरचे आकडेही समोर येतील. जसे अपडेट येतील, तसे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच.